प्रतिनिधी. संतोष साळुंके .
गणेगाव दुमाला येथे रविवार दिनांक12 .चैत्र दशमी या दिवशी अतिशय सुबक फुलांची आरास करून मंदिरात सजावट करण्यात आली होती,सायंकाळी चार नंतर शेरनी आणि दंडवत त्याचप्रमाणे रात्री नऊ वाजता देवाचा छबीना आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत प्रशासन यांनी यात्रेचे योग्य पद्धतीने नियोजन केले होते.सरपंच तुकाराम निंबाळकर,युवा उद्योजक राजू आबा कोंडे,सुभाष निंबाळकर,संभाजी नांद्रे,उत्तम भाऊ नांद्रे,पोलीस पाटील सागर जगताप , भाऊसाहेब नांदखिले,बन्सीलाल जगताप, बंडू अण्णा कोंडे आणि इतर मान्यवर ग्रामस्थ या सर्वांनी यात्रा नियोजन,संयोजक म्हणून उल्हास आणि भक्ती भावात पार पाडली.

भव्य आखाडा आणि नामांकित पैलवान यांनी यात्रेच्या शोभेत भर पाडली. सर्व धर्म सम भाव जपणारे गणेगाव दुमाला गाव नेहमीच धार्मिक,सामाजिक कार्यात अग्रेसर असते.





Users Today : 2
Users Yesterday : 26