शिरूर प्रतिनिधी:
द युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पंढरपूर या तीर्थस्थळी गौरविण्यात आले.

या पुरस्कारांमुळे समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान तर होतोच, पण इतरांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण होते.

या वर्षीही राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पंढरपूर येथे पार पडला.

या कार्यक्रमास विविध मान्यवर, अधिकारी तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.ह.भ.प. सावता महाराज वसेकर (१९ वे वशंज श्री संत शिरोमणी सावता महाराज)डॉ. प्रणिती भालके (नगराध्यक्ष : पंढरपूर शहर),दशरथ वाघमोडे (पोलिस निरीक्षक, पंढरपूर पो. ठाणे),अॅड. माधवी निगडे (पंढरपूर देवस्थान विश्वस्त),अन्सार शेख (संस्थापक/अध्यक्ष द युवा ग्रामिण पत्रकार संघ), अनिता शिंदे (वनरक्षक अधिकारी),अशोक ढाकणे (उद्योजक प्रथमेश मसाले),अॅड. प्रणव परिचारक (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष),कल्पना पवार,(राष्ट्रीय महिला अध्यक्ष: युरवा ग्रामीण पत्रकार संघटना),ह.भ.प. नामदेव महाराज साठे (अध्यक्ष: श्री संतराज महाराज पवार ट्रस्ट)यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
शिरूर तालुक्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक व्यक्तींना यावेळी मानचिन्ह व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

शिरूर शहरात स्रीरोग प्रसूती व वंध्यत्व तज्ञ (M.B.B.S.DGO mumbai) डॉ.किर्ती अशोक मदने व डॉ.हिरामण चोरे यांना आदर्श डॉक्टर पुरस्कार, संतोष यादव यांना lic मधे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार,तर अलका ढाकणे यांना उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार शरद बाळासाहेब पवार,आदर्श पत्रकार पुरस्कार प्रवीण गायकवाड ,आदर्श ग्रामसेवक म्हणून पोपट केदारी व आदर्श सरपंच पुरस्कार भाग्यश्री कमलेश बोराडे ,मानसिंग पवार उत्कृष्ट वारकरी संप्रदाय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्यात निर्वी गावातील मा.उपसरपंच प्रियंका दत्तात्रय माळवदकर,मा.सरपंच ज्योती संतोष सोनवणे,मा.सरपंच तात्यासाहेब सोनवणे,आण्णा पाटील सोनवणे,दत्तात्रय नलगे,कमलेश बोराडे,सागर काटे,भैय्या शेळके,संदीप निगडे,मा.सरपंच सुनीता सोनवणे, उपसरपंच सविता पवार,मोहिनी नलगे व विक्रम ठाकूर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, शकील मणियार राज्य अध्यक्ष रुपाली सावंत महिला राज्य अध्यक्षा,
बाळासाहेब कोठुळे राज्य सचिव, डॉ.मंगल सासवडे महिला राज्य सचिव,संतोष लांडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,दिनेश शिंदे सोलापूर जिल्हाध्यक्ष धनश्री कदम सोलापूर महिला जिल्हाध्यक्षा,प्रतिक नलावडे जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले प्रास्ताविक बाळासाहेब कोठुळे, सूत्रसंचालन व आभार ऐश्वर्या चासकर यांनी मानले






Users Today : 7
Users Yesterday : 117