शिरूर प्रतिनिधी:
शिरूर नगरपरिषद अभय योजनेसाठी अखेरचा एक दिवस बाकी असल्याची माहिती आज पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार शिरुर नगरपरिषदेने थकीत मालमत्ता करदात्यांसाठी सुरु केलेल्या अभय योजनेला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
या योजनेतून नगरपरिषदेची चांगल्या प्रकारे थकीत कर वसुली झाली आहे. शिरूर नगरपरिषदेने थकीत कर भरणा करण्यासाठी अभय योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे नागरिकांना थकीत करावरील दंड माफ करण्यात आला आहे. परंतु आर्थिक वर्ष संपत आले असतानाही या योजनेला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
३१ मार्च २०२६ पर्यंत नगरपरिषदेच्या वसुलीत आणखी रक्कम वाढण्याची शक्यता दिसत आहे. थकीत करावरील दंड माफ होत असल्याने नागरिकांनी मिळकत कर भरणा करण्यासाठी स्वतः पुढे येणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त वसूल व्हावा. यासाठी नगरपरिषदेकडून शिरुर शहरात जनजागृती केली जात आहे .
थकबाकीदारांना नोटीस, प्रत्यक्ष भेट देऊन आवाहन करुन कर भरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. ३१ मार्च २०२६ अखेर हा शेवटचा १ दिवस राहिला असल्याने जास्तीत जास्त नांगरिकांने अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रितम पाटील मुख्याधिकारी शिरूर नगरपरिषद घोडनदी यांनी केले आहे.
तरी शासकीय सुट्टीच्या दिवसी ३१ मार्च २०२६ रोजी सुद्धा नगरपरिषद कार्यालय चालू राहणार असून अभय योजने अंतर्गत मिळकत कर व पाणीपट्टी कराचा भरणा चालू राहणार आहे.





Users Today : 23
Users Yesterday : 53