विश्व हिंदू परिषद – बजरंग दल – दुर्गा वहिनी आयोजित श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा व भव्य शोभायात्रा 2026 उत्साहात संपन्न

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :
हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्रीराम नवमी जन्मोत्सव निमित्त शिरूर शहरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व दुर्गा वहिनी यांच्या वतीने अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध व भव्य स्वरूपात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

रामआळी येथील प्रभू श्रीराम मंदिरात सकाळी रामजन्मोत्सवाचा पवित्र सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रामरक्षा स्तोत्राचे सामूहिक पठन तसेच भावपूर्ण कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती.

 

तसेच कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

 

सायंकाळी ठीक ५ वाजता प्रभू श्रीराम मंदिर, रामआळी येथून भव्य दिव्य पारंपारिक शोभायात्रेला प्रारंभ झाला.

 

पारंपारिक वाद्यपथक, बँड यांच्या गजरात तसेच हातात भगवे ध्वज घेऊन “जय श्रीराम” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शोभायात्रेत युवकांसह महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक, मार्केट यार्ड येथे पोहोचल्यावर, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश जी केंदळे व उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली. या प्रसंगी देशभक्ती व धर्मभक्तीचा संगम अनुभवायला मिळाला.
यानंतर शोभायात्रेत राम दरबार रथ, गोमाता रथ,तसेच लव्ह जिहाद जनजागृती रथ,शिवमुद्रा नं. 1 डीजे, ढोलपथक यांचा समावेश होता.

या रथांद्वारे धार्मिक व सामाजिक संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात आले.

संपूर्ण मार्गावर रामनामाच्या गजराने व भगव्या ध्वजांच्या लहरींनी शिरूर शहर व पंचक्रोशी भगव्यमय झाली. मोठ्या संख्येने नागरिकांनी या शोभायात्रेत सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.
शिस्त, भक्ती आणि उत्साह यांचा संगम असलेला हा राम नवमी शोभायात्रा सोहळा 2026 अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 9 9 5 2
Users Today : 1
Users Yesterday : 25