मांडवगण मध्ये बाल आनंदी बाजार उत्साहात साजरा.

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण प्रतिनिधी: संतोष साळुंखे
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील दि.१७ मार्च रोजी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘बाल आनंदी बाजार’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देत त्यांच्या व्यवहारज्ञानात भर घालणाऱ्या या उपक्रमातून साधारण एक लाख रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल झाली.

या बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध स्टॉल उभारून भाजीपाला, किराणा साहित्य, खाऊ गल्लीतील विविध खाद्यपदार्थ यांची विक्री केली.

वडापाव, भजी, चहा यांसारख्या पदार्थांपासून ते ताक, लस्सी, मठ्ठा, मलाई दूध, पिस्ता दूध अशा पेयांपर्यंत अनेक आकर्षक पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध देण्यात आले होते. तसेच पुस्तके व शालेय साहित्यही विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

या उपक्रमात सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदवत स्वतःचे स्टॉल चालवले. विक्री, खरेदी, ग्राहकांशी संवाद यामधून त्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान मिळाले. लहान वयातच उद्योजकतेचे धडे देणारा हा उपक्रम ठरला.

कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, पालक तसेच शिक्षक वृंद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि प्रेरणा वाढविणारा हा ‘बाल आनंदी बाजार’ उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला असून, अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 9 4 6 8
Users Today : 62
Users Yesterday : 92