शाळा व्यवस्थापन समितीची नवी कार्यकारिणी जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके:

मांडवगण फराटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी अध्यक्षपदी योगेश भैया फराटे तर उपाध्यक्ष प्राजक्ता नागवडे यांची निवड

शाळा व्यवस्थापन समितीची सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नवी कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली.

सदर निवड प्रक्रिया मुख्याध्यापिका मंगला घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली शांततापूर्ण वातावरणात पार पडली.

या निवडीत योगेश भैया फराटे यांची अध्यक्षपदी, तर सौ. प्राजक्ता न्यानेश्वर नागवडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

तर सदस्य म्हणून माऊली मोहन फराटे, कृष्णा शामराव परदेशी, पांडुरंग बाळासो शितोळे, शरद दुर्गा जी भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

महिला सदस्य म्हणून सौ. स्वाती पुरुषोत्तम नागवडे, सौ. शिल्पा सूर्यकांत साळुंके, सौ. पूजा बापू लांडगे, सौ. काजल रोहित कांबळे, सौ. लक्ष्मी शंकर थोरात यांचा समावेश करण्यात आला आहे.

शिक्षक तज्ज्ञ म्हणून राजू प्रल्हाद कांबळे, तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ. विश्वमाला अशोक कारखिले यांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय प्रेम सागर पाटील विद्यार्थी व मानसी प्रमोद भंडलकर विद्यार्थिनी प्रतिनिधींची निवड केली आहे.

निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

मुख्याध्यापिका मंगला घोरपडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 8 2 8 3
Users Today : 21
Users Yesterday : 80