Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

मांडवगण फराटा येथे शिवजयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी….

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके

दिनांक.19 फेब्रुवारी. मांडवगण फराटा येथे ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने भव्य दिव्य अशी ऐतिहासिक मिरवणूक सायंकाळी सहा वाजता सुरू झाली.

1c11c641-626d-4514-9942-402e66d61648

तीन तास चाललेल्या या मिरवणुकीत लाठी काठी ,तलवार बाजी ,दांडपट्टा अशी मर्दानी प्रात्यक्षिके शालेय विद्यार्थिनींनी सादर केली.अंगावर शहारे आणणाऱ्या ऐतिहासिक खेळामुळे सर्व वातावरण शिवमय झाले होते.

श्रीराम तरुण मंडळ फराटे वाडी यांचे पारंपरिक ढोल लेझीम पथक लक्ष वेधून घेत होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन विकास फराटे यांनी केले.शिवरायांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे .न्याय नीती हे गुण माणसास नेहमीच चांगले जीवन जगण्यास सार्थकी ठरतात ,अशा शब्दात किशोर (हरी) फराटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तुकारामबापू फराटे म्हणाले की प्रत्येक दिवशी शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आयुष्याची वाटचाल केली ,तर प्रत्येक विद्यार्थीचे सुसंस्कृत आणि आदर्श व्यक्तिमत्व घडल्या शिवाय राहणार नाही.अशा मंगलमय,शिवमय वातावरणार हजारो लोकांच्या उपस्थितीत या सुवर्ण सोहळ्याची सांगता झाली.

Screenshot
punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21