जॉईंट कमिशनर संदीप पवार यांचा निर्वी येथे भव्य नागरी सत्कार.. अनेक मान्यवर व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित..

Facebook
Twitter
WhatsApp

जॉईंट कमिशनर संदीप पवार यांचा निर्वी येथे नागरी सत्कार

शिरूर प्रतिनिधी:

भारतीय इन्कम टॅक्स विभागात जॉईंट कमिशनर पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल निर्वी गावचे सुपुत्र संदीप पवार यांचा समस्त ग्रामस्थ निर्वी यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

 

दि. ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता निर्वी(ता शिरूर)येथील जागृत देवस्थान बालेशा बाबा मंदिर परिसरात हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या वेळी बोलताना संदीप पवार यांनी विद्यार्थ्यांना व तरुणांना यशाचा मार्ग दाखवणारे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “अभ्यास कसा करायचा हे ठरवले तर यश नक्की मिळते. मोबाईलचा योग्य वापर केल्यास तो ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरतो,” असे त्यांनी सांगितले. योग्य वेळी योग्य व्यक्तीची साथ मिळणे महत्त्वाचे असल्याचे नमूद करत, आपल्या यशामागे मामांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

वेळेचे योग्य नियोजन..

यशाची गुरुकिल्ली..

वेळेचे योग्य नियोजन हे यशाचे प्रमुख सूत्र असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सकाळी लवकर उठणे, आई-वडील व इष्टदेवतांचे स्मरण, नियमित व्यायाम आणि शांत मनाने दररोज किमान एक तास अभ्यास करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. शाळेत शिकवलेला अभ्यास मनापासून करावा आणि ध्येय कायम डोळ्यांसमोर ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

बालेशा बाबा जागृत देवस्थान:
ग्रामदैवत बालेशा बाबा हे जागृत देवस्थान असल्याचे नमूद करत त्यांनी श्रद्धेचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या दीड महिन्यात आलेली सकारात्मक अनुभूती आणि मिळालेले प्रमोशन हे श्रद्धा, मेहनत व सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. “सुरुवातीला अपयश आले तरी हार मानू नका. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनत असेल तर यश निश्चित मिळते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


या कार्यक्रमात ग्रामस्थांनी संदीप पवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अनेक नागरिकांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या भव्य नागरी सत्कार समारंभास विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकीय, कला व सहकार क्षेत्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी ठरला.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 1 7 1
Users Today : 6
Users Yesterday : 7