Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

प्रवास वर्णन लेखन स्पर्धेत उत्तम सदाकाळ यांचा विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी:
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी राज्यातील सर्व शिक्षक, अधिकारी यांचेसाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले होते. रमणबाग पुणे येथे झालेल्या विभागीयस्पर्धेत अहिल्यानगर, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाळे, केंद्र- मढ, ता. जुन्नर या शाळेतील पदवीधर शिक्षक उत्तम निवृत्ती सदाकाळ यांनी “नीलगाईच्या शोधात…” हा लेख लिहून ‘प्रवास वर्णन लेखन’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
उत्तम सदाकाळ यांनी या यशामुळे करंजाळे गावाचे, जुन्नर तालुक्याचे व पुणे जिल्ह्याचे नाव उंचावल्याने त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

उत्तम सदाकाळ यांनी, विभागीय स्पर्धेतील हे यश गटशिक्षणाधिकारी मा. अशोक लांडे, विस्ताराधिकारी विष्णू धोंडगे, केंद्रप्रमुख मधुकर आढारी, मुख्याध्यापक साहेबराव मांडवे, विषयतज्ञ दीपाली थोरात, सीमा मोरे यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेमुळे प्राप्त झाल्याचे आपले मत व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार तसेच अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत असणाऱ्या उत्तम सदाकाळ यांची ‘पाऊस’ कविता इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असून त्यांचा ‘कमाई’ बालकथा संग्रह शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे यांनी इयत्ता चौथी ते पाचवीच्या मुलांसाठी समग्र शिक्षा तर्फे प्रकाशित केलेला आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 5
Users Today : 3
Users Yesterday : 21