पुणे प्रतिनिधी:सागर पवार
गेल्या वर्षभरापासून चर्चेत असणारा लेखक संजय ऐलवाड लिखित झिब्राच्या कथा हा कथासंग्रह बालवाचकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाला. लहानग्यांना यातील कथा खूपच आवडल्या. झिब्राचे कादंबरी स्वरूपात पुस्तक असावे, अशी मागणी शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी, हवेलीतील जगतापवाडी, मुळशी तालुक्यातील ताथवडे, मोहरी आणि चोरघेवाडी या शाळेतील चिमुकल्यांकडून होत राहिली. बालचमुंच्या आग्रहास्तव ऐलवाड यांनी वर्षभरातच कादंबरीचे काम पूर्ण करून बाल वाचकांच्या हातात येत्या जानेवारीत ते सुपूर्त करत आहेत.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालसाहित्यिक व युवा लेखक संजय ऐलवाड हे बालसाहित्यातले आघाडीचे लेखक आहेत. त्यांचा झिब्राच्या कथा हा कथासंग्रह महाराष्ट्रात गाजत आहे. या पुस्तकांचे वाचन राज्यातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी केले. झिब्राच्या कथानकाला बालवाचकांनी गेल्या वर्षभरात उदंड प्रतिसाद दिला. कथांच्या स्वरूपात असणारी झिब्रा कादंबरीच्याही स्वरूपात आम्हाला वाचायला मिळावी, अशी मागणी छोट्या चिमुकल्यांकडून झाल्याने वर्षभरातच लेखक ऐलवाड यांनी या कथानकाला कादंबरीचे स्वरूप देत छोट्या बाल दोस्तांची मागणी पूर्ण केली. झिब्रा आता कादंबरीच्या स्वरूपात येणार असल्याने बालवाचकांना ही आनंदाची पर्वणीच आहे.

बाल साहित्यिक संजय ऐलवाड लेखन करताना आपल्या मुलांना केंद्रभूत मानून विचार करत असल्याने त्यांचे लेखन थेट काळजाला भिडते. त्यामुळे केवळ लहानांनाच नव्हे तर थोरामोठ्यांनाही त्यांच्या कथा विशेष आवडतात. इतके की ते आपले बालपण त्यात शोधतात. बऱ्याच वेळा बालसाहित्यिक बालसाहित्य लिहिताना आपल्या लहानपणाचा विचार करत लिहितात परंतु ऐलवाड हे स्वतः आपल्या मुलांमध्ये रमत असल्यामुळे त्यांच्या लिखाणात नेहमी नावीन्यता असते. याच कारणामुळे त्यांचे बालसाहित्य आजच्या पिढीला हवेहवेसे वाटते. इतके ते सहज, सुंदर आणि ओघवत्या शैलीत आले आहे.

संस्कृती प्रकाशनाच्या प्रकाशिका सुनिताराजे पवार यांच्याकडून महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालसाहित्यिक संजय ऐलवाड यांचा नवाकोरी बाल कादंबरी वाचकांच्या भेटीला येत आहे. संपूर्ण फोर कलर मध्ये असलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ व आतील चित्रे प्रसिद्ध चित्रकार प्रतीक काटे यांनी साकारले आहेत. साहित्य अकादमी बालसहित्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक भारत सासणे यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे.







Users Today : 6
Users Yesterday : 7