शिरूर प्रतिनिधी:
शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत आज दि.१३/११/२०२५ रोजी मातोश्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष व शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे मा. उपसभापती पत्रकार अभिजित आंबेकर यांनी वार्ड क्रमांक १२मधून नगरसेवक साठी अर्ज दाखल केला आहे. तसेच वार्ड क्रमांक ११मधून महिला उमेदवार सुनंदा जाधव यांनी ही आज अर्ज दाखल केला आहे.
यावेळी अभिजित आंबेकर यांच्या बरोबर काँग्रेस आय चे शहराध्यक्ष किरण आंबेकर, शिरूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, नितीन बारवकर, पांडुरंग धुमाळ, धर्मा मैड , मुकुंद ढोबळे, प्रवीण गायकवाड, अनिल सोनवणे, संतोष शिंदे, मदन काळे, सुदर्शन दरेकर, फैजल पठाण, शिकलकर, सतीश केदारी, दिपाली काळे, शोभा परदेशी व हुडको कृती समिती शिरूर चे शैलेश जाधव व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सोमवार १७/११/२०२५ अशी आहे.

आता पर्यंत ६उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्ष पदासाठी एक ही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती आज निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित जगताप व शिरूर नगर परिषद चे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी दिली.








Users Today : 374
Users Yesterday : 26