Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशन आयोजित “दिवाळी पाडवा पहाट २०२५”ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Facebook
Twitter
WhatsApp

[वाघोली पाडवा पहाट,
कार्यक्रमात आमदार ज्ञानेश्वर कटके यांची मोठी घोषणाबाजी – वाघोलीतील अनेक प्रलंबित प्रकल्पांना मिळणार गती!
शिरूर पुणे रोडचे लवकरच होणार भूमिपूजन!]

शिरूर प्रतिनिधी:
वाघोली (ता. हवेली) – वाघोली येथे पार पडलेल्या भव्य दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमात शिरुर-हवेलीचे आमदार माऊली ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोली व परिसरातील नागरिकांना दिलासा देणाऱ्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यामध्ये वाघोली ते शिरूर फ्लायओव्हर टेंडर, मेट्रो प्रकल्प, रिंगरोड, पाणी व ड्रेनेज समस्या, आर.पी. रोड, शासकीय हॉस्पिटल, आणि लोणीकंद येथे भव्य स्टेडियम उभारणी अशा अनेक कामांचा समावेश आहे.
पुणे नगर रोडच्या कामाचे लवकरच भूमिपूजन
वर्तमानात पुणे-शिरूर दरम्यान वाहनचालकांना रोज वाहतुकीची तीव्र कोंडी सहन करावी लागत आहे. नागरिकांचे अनेक तास या प्रवासात वाया जात आहेत. पुणे नगर रोड हे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. मात्र, आता या प्रकल्पाला गती मिळाली असून, लवकरच या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आमदार कटके यांनी दिली.
वाघोली ते शिरूर फ्लायओव्हर – टेंडर प्रक्रियेला सुरुवात
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाघोली ते शिरूर दरम्यानचा फ्लायओव्हर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच काम सुरू होईल, असे आश्वासन आमदार कटके यांनी दिले.

रिंगरोड व पायाभूत सुविधा:

मेट्रो, रिंगरोड व पायाभूत सुविधा
वाघोली परिसरासाठी मेट्रो प्रकल्पाच्या वाढीव फेऱ्या, तसेच रिंगरोड च्या कामासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा सुरू आहे. यामुळे भविष्यात वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला.
पाणी व ड्रेनेज समस्येवर कायमस्वरूपी उपाय
वाघोलीतील पाणीटंचाई व ड्रेनेज समस्यांवर स्थायी उपाययोजना करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. लवकरच नवे पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होणार आहे.
शासकीय हॉस्पिटल व स्टेडियम
वाघोलीत शासकीय हॉस्पिटल प्रस्तावित असून, त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, लोणीकंद येथे भव्य क्रीडांगण (स्टेडियम) उभारण्यात येणार आहे, जे परिसरातील तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरेल.

“वाघोली आणि शिरूर-हवेली मतदारसंघातील नागरिकांचा विकास हेच माझं ध्येय आहे. सर्व प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे,”माऊली ज्ञानेश्वर कटके, आमदार, शिरूर-हवेली

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 9
Users Today : 7
Users Yesterday : 21