Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

शिरूरचा कचरा डेपो पेटवतो नक्की कोण ? पेटवला जातो की…..?

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता प्रेरणा उद्यान (कचरा डेपो) येथील सिमेंटचे कंपाऊंड वॉल दि.२२ मार्च २०२५ रोजीचे मध्यरात्री अज्ञात इसमाने तोडफोड केल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमाविरुध्द शासकिय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण बोलते नगर पालिका कचरा  पेट व ते तर…

तसेच कचरा डेपो येथील कचरा पेटविल्याप्रकरणी सुध्दा अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरचा कचरा पेटविल्यामुळे त्यापासून निर्माण झालेल्या धुरामुळे आजुबाजुच्या नागरिक, रहिवाश्यांना आरोग्य विघातक त्रास झालेला आहे.

शिरुर नगरपरिषदेने नगरपरिषद हद्दीतील स्वमालकीच्या व शासकीय जागा सिमेंटच्या कंपाऊंड वॉल जागेच्या चौहुबाजूने लावून संरक्षित केलेल्या आहेत. त्यात १) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्र (STP), (२) पाबळ फाटा जवळ, (३) शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केटयार्ड) समोर, (४) स्वच्छता प्रेरणा उद्यान (कचरा डेपो), (५) सोनार आळी येथील हनुमान मंदिर समोर,या आहेत.

यापुढील काळात शिरुर शहरातील नागरिक, रहिवाशी, व्यापारी, व्यवसायिक यांना कळविण्यात येते की सदरहु नगरपरिषदेने सिमेंटच्या कंपाऊंड वॉलने संरक्षित केलेल्या जागा व त्या जागेचे कंपाऊंड वॉल तोडल्याचे, वॉलवर अनधिकृतपणे रंगरंगोटी अथवा जाहिरातबाजी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर मालमत्ता विदृपीकरण कायदा १९९५ अंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा न्यायसंहिता अन्वये पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल ,अशी माहिती शिरूर मुख्याधीकारी प्रितम पाटील यांनी दिली आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 2 8 8
Users Today : 27
Users Yesterday : 199