शिक्रापूर प्रतिनिधी:भरत चव्हाण
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापवाडी( शिंदेवाडी) येथे विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचा कलाविष्कार पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत बक्षिसांची बरसात केली.
जगतापवाडी( शिंदेवाडी) येथे विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले.
या कार्यक्रमात एकूण 22 गाण्यांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून शिवरायांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यात शिवकन्या, आम्ही जातीचे शेतकरी, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, फुलपाखरू, गुलाबी साडी, आणि झुलवा पाळणा यांसारख्या बहरदार गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. शेवटी सर्वांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाषआप्पा जगताप उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिंदेवाडी गावचे सरपंच संदीपनाना जगताप, कानिफनाथ सोसायटीचे चेअरमन नवनाथ जगताप, शिंदेवाडीचे माजी उपसरपंच मोहन शिंदे, वाबळेवाडी शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर, संदीप गायकवाड, केंद्रप्रमुख भालचिम साहेब, हनुमंत वाळुंज, रवी कोहिनकर, संतोष विधाटे, विजय गोडसे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिजीत जगताप, माजी उपसरपंच मोहन शिंदे ,रमेश देवकर, चेअरमन नवनाथ जगताप, सागर देवकर, अक्षय जगताप, आप्पासाहेब जगताप, राजेंद्र भोसले, माजी अध्यक्ष राहुल जगताप, सत्यवान जगताप, अनिल जगताप,सागर जगताप, गणेश मेमाणे, शरद जगताप, घनश्याम जगताप,नितीन शिंदे, दीपक शिंदे ,सिद्धार्थ शिंदे, रमेश देवकर सत्यवान जगताप, शरद जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप गायकवाड यांनी केले. मुख्याध्यापिका मधुबाला वेताळ यांनी प्रास्ताविक केले, उपक्रमशील शिक्षिका व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मीना म्हसे यांनी स्वागत तर उपशिक्षक काशिनाथ डफळ यांनी आभार मानले.
