कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे)
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती मंगलदास बांदल २१ ऑगस्ट २०२४ रोजी ईडीकडून कारवाई करण्यात आली होती, कोटींची मालमत्ता तसेच मनीलॉडरींग सह अनेक गुन्हे बांदल यांच्यावर दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती बांदल यांना सशर्त जामीन पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी मंजूर केला असून आता त्यांची कारागृहातून सुटका होणार आहे
मंगलदास बांदल यांच्यावर २१ ऑगस्ट २०२४ रोजी केलेल्या कारवाई साडेपाच कोटी रुपये जप्त केले होते.तसेच शिवाजीनगर बँक घोटाळा प्रकरणी बांदल यांनी तुरुंगवास भोगला आहे. त्यानंतर ईडीने अटक केल्याने बांदल तुरूंगात आहे अकरा मार्च रोजी जामीन मंजूर झाला असून बारा मार्च रोजी बाहेर येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांकडून माध्यमांना मिळाली.






Users Today : 126
Users Yesterday : 898