Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

महिलांसाठी मोफत मोमोग्राफी… जाण्या येण्या साठी मोफत बस…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
सध्या जगात सगळीकडेच ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे… फक्त पाश्चात्य देशांमध्येच नाही तर भारतात सुद्धा याचे प्रमाण लक्षणीय आहे.
याबाबतीत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून अनेक संस्था आणि डॉक्टर्स तळमळीने काम करत असतात. कारण लवकर निदान झाले तर सगळ्यात लवकर आणि पूर्णपणे बरा होणारा हा कॅन्सरचा प्रकार आहे.

आता याचे निदान लवकर व्हावे म्हणून काय करायचे?हा प्रश्न बहुतेक महिलांना पडलेला असतो.

यावर उपाय म्हणून आपल्या शिरूर मधील डॉ.प्राजक्ता लुणावत व त्यांच्या सहकारी डॉ.यांनी मिळून खास शिरूर शहरातील महिलांसाठी पुणे येथे तपासणी करता डॉ.शेखर कुलकर्णी व फियाट कंपनी यांच्या मार्फत तपासणी शिबिर आयोजित केले आहे .माघील जवळजवळ दहा ते पंधरा दिवसापासून अनेक महिलांनी याचा फायदा घेतला आहे.
तर चाळीशी नंतरच्या प्रत्येक स्त्रीने नियमितपणे स्तनांची योग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे व
सध्या तर तंत्रज्ञान खूप प्रगत असल्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेत ब्रेस्ट कॅन्सरचे निदान करणे सोपे झाले आहे.

असेच ब्रेस्ट कॅन्सर साठी काम करणारे एक प्रसिद्ध ब्रेस्ट सर्जन म्हणजे डॉक्टर शेखर कुलकर्णी हे सध्या शिरूर तालुक्यातल्या महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत व त्यांना आर्थिक सहाय्य फियाट कंपनी करत आहे.

मॅमोग्राफी ही स्तनांची तपासणी 40 नंतरच्या स्त्रियांसाठी खूप महत्त्वाची आहे जी एरवी अडीच ते तीन हजार रुपयात होते ती सध्या शिरूरकर महिलांसाठी मोफत होते आहे.

अधिकाधिक महिलांना ही माहिती पोहोचावी व त्यांनी ही मोफत तपासणी करून घ्यावी हे आवाहन लुणावत मॅडम यांनी केले आहे.

मॅमोग्राफी सेंटर पुणे येथे जाण्या येण्यासाठी मोफत बस सेवा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
मोफत मॅमोग्राफी आणि मोफत बस प्रवास एवढेच नाही तर दुर्दैवाने काही निदान झालेच तर शस्त्रक्रियेपर्यंत सगळे उपचार सुद्धा मोफत देण्यात येणार आहेत.
शिरूर मधल्या महिला डॉक्टर्स कडून तुम्ही चिठ्ठी घेऊन जाऊ शकता किव्हा अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क करू शकता.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21