Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

मनाला आनंद देणाऱ्या संस्कारक्षम कथा

Facebook
Twitter
WhatsApp

संजय ऐलवाड लिखित झिब्राच्या कथा हे पुस्तक पाहिले.संस्कृती प्रकाशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक 2024 सालात प्रकाशित झालेले आहे. मुलांना आवडेल आणि पाहिल्यानंतर मुले सहज हातात घेतील असे मुखपृष्ठ आणि आतील चित्रे आणि देखणी मांडणी यामुळे पुस्तक अधिक आकर्षक झाले आहे .सुप्रसिद्ध लेखक ल. म. कडू यांची पाठराखण या पुस्तकाला लाभली आहे. प्रतीक काटे या चित्रकारांनी काढलेली चित्रे तेवढीच बोलकी आणि अधिकाधिक निसर्गाकडे नेणारी आहेत. ५७ पानांचे पुस्तक झिब्राच्या नऊ छोट्या छोट्या आणि छान छान गोष्टी घेऊन बालवाचकांसमोर आले आहे.लहान मुलांसाठी असणारी अक्षरांची उंची आणि आकार. सहज सोपी भाषा यामुळे हे पुस्तक बालकांच्या मनात एक वेगळ्या उंचीवर जागा निर्माण करते.
झिब्रा एक छोटी मुलगी जिला निसर्गाची ओढ आहे, आवड आहे. सोबतच तिला निसर्गासाठी काहीतरी करावं असं सातत्याने वाटतं. तिला माहित आहे आपण खूप लहान आहोत पण तरीही आपले छोटे छोटे प्रयत्न सुद्धा काहीतरी बदल घडवून आणतील असंही तिला वाटत आणि मग ती आपला बाबा आपली आई, नातेवाईक यांच्या सोबत राहून छोटे छोटे प्रयत्न करतच राहते. कधी कधी यातून काहीतरी मोठे बदल घडून येतात. यातून छोट्या बाल दोस्तांना प्रेरणा मिळते.
झिब्रा निसर्गात शोध लावते, बोध घेते .सोबतच तिला काही गोष्टींचं वाईटही वाटतंय जसं की चिमण्या आपल्यापासून दूर गेल्या या गोष्टीचा तिला खूप खूप वाईट वाटतं आणि चिमण्या पुन्हा एकदा आपल्या जवळ आल्या पाहिजेत असंही वाटतं.निसर्गाला होणाऱ्या वेदना झिब्राला दुःख देतात आणि निसर्गामध्ये योग्य तो बदल घडवून आणण्याचे स्वप्न झिब्रा नेहमी उराशी बाळगून असते. निव्वळ स्वप्न बाळगून ती थांबत नाही तर त्यासाठी ती प्रयत्नशील देखील राहते.
झिब्राला लाजाळूच्या वेलीचे कुतूहल आहे. वारुळाच्या रचनेचे कुतूहल आहे .निसर्ग झाड वेली म्हटलं की झिब्राची कळी खुलते. निसर्ग पाहून तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि ती ह्या प्रश्नांची उत्तरं बाबांकडून घेते. झिब्राचे बाबा झिब्राचे खूप लाड करतात. झिब्रा आणि बाबा यांच्यातलं नातं खूप घट्ट आहे. झिब्राला काही चांगल्या सवयी लागाव्या, म्हणून झिब्राचे बाबा आणि झिब्राची आई दोघेही नकळतपणे प्रयत्न करत राहतात. खरंतर आजच्या पिढीतल्या मुलांना खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी लागाव्या, यासाठी केले जाणारे प्रयत्न फारच तोकडे आहेत .मुलांना भाज्यांची गोडी लागावी, यासाठी पालक वेगळेपणाने काही करत नाहीत. फक्त सतत सांगत राहतात परंतु झिब्राच्या आई-बाबांनी केलेले प्रयत्न निश्चितच लक्षवेधक आहेत. काही गोष्टी मुलांना सांगण्याऐवजी कृतीतून दाखवल्या तर लवकर समजतात. ही छोटी झिब्रा सतत निरीक्षण करत राहते आणि सततच्या निरीक्षणातून ती रांजण खळग्यांसारखे शोधही लावते. झाड पण झोपतात हा तिचा तिने लावलेला शोध. मोठी माणसं लहानांना काही तरी सांगतात आणि स्वतः विसरून जातात. झिब्रा या मोठ्यांना आठवण करून देते अशी ही छोटी झिब्रा पैशाचे झाड पण लावते बरं का! पण बाबांनी समजावल्यावर तिला समजत देखील की पैसे नेमके कुठून येतात आणि कसे येतात?
तुम्हा वाचकांनाही आता हे सगळं वाचून नक्कीच कुतूहल निर्माण झालेलं असेल ही झिब्रा आहे तरी कशी आणि आहे तरी केवढी? तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी झिब्राच्या कथा हे पुस्तक नक्की वाचा. झिब्राच्या कथा वाचून तुम्हाला हे निसर्गाचं वेड नक्कीच लागेल आणि तुम्हालाही वाटेल की आपणही निसर्गातील काही गोष्टी वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. निसर्ग वाचवणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक आवडेल यात शंका नाही.

[कल्पना मलये-कणकवली]

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 2 5 9
Users Today : 197
Users Yesterday : 503