Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

व्याख्यान मालिकेस सर्वानी उपस्थित राहावे:धनक

Facebook
Twitter
WhatsApp

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी दि.10/02/2025 रोजी पत्रकार परिषद घेत ,या उत्सव समिती ची स्थापना होऊन जवळ जवळ 41 वर्ष झालेली असून,आम्ही स्व.धनराज नहार स्मृती निमित्त व्याख्यान माला आयोजित करतो आहोत.
या व्याख्यानमालेचे यंदाचे २८ वे वर्ष आहे .१५ फेबृवारी ते १९ फेबृवारी २०२५ रोजी ही व्याख्याने सायंकाळी दररोज पावणेसात वाजता साई गार्डन मंगल कार्यालय कॉलेज रोड येथे होणार आहेत . व्याख्यानमालेचे पहिले व्याख्यान १५ फेबृवारीस माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी ‘न्यायव्यवस्था सद्यस्थिती आणि आव्हाने ‘ या विषयावर गुंफणार आहेत . १६ फेबृवारीला इतिहास संशोधक व ज्येष्ठ पत्रकार अशोककुमात पांडेय हे ‘ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतिचा भारतीय राजकारणावर झालेला परिणाम ‘ या विषयावर बोलणार आहेत . १७ फेबृवारी रोजी माजी मुख्य सचिव महेश झगडे हे ‘ लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही : संविधानिक जबाबदा-या आणि वास्तव ‘ या विषयावर बोलणार आहेत .१८ फेबृवारीस इतिहास संशोधक व व्यवस्थापन मार्गदर्शक डॉ . अजित आपटे हे ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन शास्त्र ‘ या विषयावर बोलणार आहेत .१९ फेबृवारीस प्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले हे ‘ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एकूण लेखन ‘ या विषयावर बोलणार आहेत .
शिवजयंतीला बुधवार दिनांक १९ फेबृवारीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन नगरपालिका मंगल कार्यालय येथे करण्यात येणार आहे .
यावेळी पोलीस उपविभागीय आधिकारी प्रशांत ढोले ,तहसिलदार बाळासाहेब म्हस्के ,उद्योजक व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल , मुख्याधिकारी प्रितम पाटील , पोलीस निरीक्षक संदेश उपस्थित राहणार आहेत.
या सर्व व्याख्यानमालेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन धनक यांनी केले आहे .तसेच शिवजयंती निमित्ताने व्याख्यान घेऊन फक्त शिवाजी महाराजांचे कार्य न समजता छत्रपती शिवाजी महाराज काय होते,त्यांचे नियम काय होते हे ही या व्याख्यान मालिकेतून समजते व समाजाला एक उर्जा मिळते असे मा.नगरसेवक मंगेश खांडरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ॲड .ओमप्रकाश सतीजा , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , नीलेश नहार , विलास गोसावी , विजय नहार ,खुशाल गाडे , माजी नगरसेवक मंगेश खांडरे , प्रा . चंद्रकांत धापटे , रामभाउ इंगळे , संतोष शितोळे , संजय बांडे , ॲड . विक्रम पाटील , श्रेणिक नहार , नितीन गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 2 6 0
Users Today : 198
Users Yesterday : 503