Breaking News
“शिवमुद्रा पतसंस्थेच्या कार्यक्रमात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; सरपंच पंकज कारखिले यांच्या कार्याचे कौतुक – सुजय विखे पाटील ‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई

स्वयंसेवी संस्थेकडून शालेय उपयोगी वस्तूंची भेट

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी
इनरवेल क्लब ऑफ पुणे रिव्हर रिदमस या स्वयंसेवी संस्थेतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठाकरवाडी येथे शालेय उपयोगी वस्तूंची भेट देण्यात आली.
तसेच नुकतेच विद्यार्थ्यांना गरम कपड्यांचे वाटप करण्यात आले.
भेट देण्यात आलेल्या साहित्यात दोन सिलिंग फॅन, स्मार्ट टीव्ही, मुलांना ट्रॅक सुट, खुर्च्या, शूजस्टॅन्ड, मुलांना स्वेटर, कानटोपी, टेबल, कपाट, खेळाचे साहित्य आणि मुलांसाठी खाऊ आदींचा यामध्ये समावेश आहे.
संस्थेच्या अध्यक्षा निकिता मित्तल, सचिव दिप्ती सरोगी, प्रियंका गुप्ता, प्राची अगरवाल, व्रिद्धी गुप्ता अतुल अग्रवाल, नागेश कड, जि. प. प्रा. शाळा आगळंबेचे शिक्षण सत्तार तांबोळी, जि. प. प्रा. शाळा ठाकरवाडीच्या प्रभारी मुख्याध्यापिका मनीषा बुंदे, सहशिक्षिका देवश्री रेपाल, ठाकरवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास पायगुडे आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जि. प. प्रा. शाळा आगंळबेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र हिलाळ यांनी भुषविले. निकीता मित्तल, नागेश कड, सत्तार तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले. देवश्री रेपाल यांनी सुत्रसंचालन केले. मनीषा बुंदे यांनी आभार मानले.

[चौथीत शिकणार्‍या मुलीने केली मदत
व्रिद्धी गुप्ता या चौथीत शिकणार्‍या मुलीने दिवाळीत स्वत: पणत्यांची डिझाईन करून विक्री केली होती. त्यातून मिळालेल्या पैशातून या मुलींने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठाकरवाडी (ता. हवेली) या शाळेतील 18 विद्यार्थ्यांना स्वेटर व कानटोपी भेट दिली. व्रिद्धी गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत पणत्या विकते. त्यातून मिळालेल्या पैशातून ती सामाजिक कार्य करते, असे तिच्या पालकांनी सांगितले.]

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 3 3 5
Users Today : 74
Users Yesterday : 199