Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

हिवाळी शिबिराचे उद्घाटन…..

Facebook
Twitter
WhatsApp

शिरुर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील निघोज येथे शिरूर येथील सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन नुकतेच झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निघोज गावाच्य सरपंच चित्राताई वराळ यांनी भूषवले. तर सचिन पाटील वराळ, ज्ञानेश्वर वरखडे , डॉ. सहदेव आहेर ,  डॉ ज्ञानेश्वर कवाद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच निघोज गावातील इतर मान्यवर देखील उपस्थित होते.
डॉ ज्ञानेश्वर कवाद म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांमध्ये संस्कारची जडणघडण होत असते .महाविद्यालयाच्या वतीने आयोजित श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविले जातात ,असे प्रतिपादन डॉ. प्रा सहदेव आहेर यांनी संगीतले.
या श्रमसंस्कार शिबिरात वृक्षारोपण डिजिटल साक्षरता, मतदान जनजागृती,महिला सबलीकरण असे विविध कार्यक्रम घेणार असल्याचे माहिती कार्यक्रमाधिकारी प्रा. मोनाली परभाने यांनी यावेळी सांगितली.

या कार्यक्रमाची सुरुवात प्रख्यात शिववाख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांच्या शिववाख्यांनाने झाली. महाराजांचे विविध गुण सांगून त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

तर सचिन पाटील वराळ यांनी हिवाळी शिबिराला लागणारी सर्वतोपरी मदत येथील ग्रामस्थ करतील, अशी ग्वाही दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल शहा व डॉ. बाहेती यांनी रा. से. यो स्वयंसेवकांना सामजिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 9
Users Today : 7
Users Yesterday : 21