Breaking News
“शिवमुद्रा पतसंस्थेच्या कार्यक्रमात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; सरपंच पंकज कारखिले यांच्या कार्याचे कौतुक – सुजय विखे पाटील ‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई

वडिलांना टकल्या म्हटल्याचा रागातून अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीचा दगडाने ठेचून केला खून

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव भिमा/प्रतिनिधी:विनायकसाबळे
वाघोली परिसरात बुधवारी दुपारी दीडच्या वाजण्याच्या सुमारास खुनाचा प्रकार घडला. एका अल्पवयीन मुलाने दगडाने ठेचून एका व्यक्तीचा खुन केला. मद्याच्या नशेत एका व्यक्तीने वडिलांना टकल्या म्हणण्याचा राग आल्याने या अल्पवयीन तरुणांनी हे कृत्य केले. राजू लोहार (वय ४६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर १६ वर्षीय अल्पवयीन आरोपी वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्ती व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वाघोलीतील दरेकर वस्ती परिसरात ते राहतात. दरम्यान काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोघेही मद्य प्राशन करत बसले होते. त्यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला. आणि मयत राजू लोहार या व्यक्तीने आरोपी यांना उद्देशून तुझा बाप टकल्या असे म्हंटले. त्याचा राग धरून आरोपी अल्पवयीन तरुणाने आरोपीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

शेजारीच पडलेला भला मोठा दगड उचलून आधी पाठीत नंतर छातीवर टाकला. दगडाचा वार वर्मी लागल्याने राजू लोहार यांचा मृत्यू झाला. वाघोली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 3 3 3
Users Today : 72
Users Yesterday : 199