Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

शिरूर नगरपालिकेचे नवीन मुख्याधिकारी प्रितम पाटील

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून प्रितम पाटील नुकतेच रुजू झाले आहेत.
प्रितम पाटील हे 2017 ला एमपीएससी परीक्षा पास करात प्रथम ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त व भिवंडी महानगरपालिका येथे ही सहाय्यक आयुक्त म्हणून होते.
काही दिवसांपूर्वी शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर प्रितम पाटील यांनी मुख्याधिकारी म्हणून प्रथमच कार्यभार सांभाळा आहे.
आपला कार्यभार सांभाळताना शिरूर शहरातील अडचणी व स्मिता काळे यांच्या काळात सुरू असणाऱ्या कामांची पूर्ण माहिती पाटील यांनी घेत, आपण ही यापुढील कामकाजात पर्यावरण विषयी कामांना प्राधान्य देऊ व नदी सुधार प्रकल्पांतर्गत नदीच्या किनारपट्टीची सुधारणा करून ,” वॉक वे ” अंतर्गत असणारे काम मार्गी लावणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच काही वर्षांपूर्वी पाण्याने तुडुंब भरून वाहणाऱ्या मोती नाल्याला आत्ता जे गटाराचे स्वरूप आले आहे ते थांबविण्याचा व त्याच्या पुनःप्रवाहासाठी जुन्या पद्धतीने दगडी भिंती घालून प्रवाह सुरळीत करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत व शिरूर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही प्रीतम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचे आभार राहुल पिसाळ यांनी यावेळी मांनले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 9
Users Today : 7
Users Yesterday : 21