Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

पिंपरी दुमाला शाळेत शिक्षण परिषदचे आयोजन

Facebook
Twitter
WhatsApp

सरदवाडी प्रतिनिधी: दत्तात्रय कर्डिले
राज्य शासनाच्या सूचनेनुसार बालकांची सुरक्षितता व पालक, शिक्षक यांची जबाबदारी काय आहे,याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कोंढापुरी केंद्रातील सर्व शिक्षकांची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी दुमाला येथे घेण्यात आली होती.
सध्या समाजामध्ये बालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे,या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र व पुणे जिल्ह्यामध्ये अशा परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये प्रामुख्याने पोस्को कायदा जागृती ,सखी सावित्री समितीची रचना व त्या समितीचे कार्य आणि त्या अनुषंगाने पालक व शिक्षक यांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. पिंपरी दुमाला येथे त्या अनुषंगाने घेण्यात आलेली ,शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात पार पडली.
या शिक्षण परिषदेसाठी केंद्रप्रमुख यशवंत रणदिवे, सरपंच महेंद्र डोळस,पोलीस पाटील संतोष जाधव, शाळा समिती अध्यक्ष शशिकांत चिखले, उपाध्यक्ष वर्षा खळदकर,तेजश्री चिखले यांनी मार्गदर्शन केले.
उपस्थित शिक्षकांना सुलभक म्हणून उत्तम होलगुंडे, वर्षा नऱ्हे, सुकन्या धुमाळ यांनी काम पाहिले.
शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी शालेय समिती सदस्य विशाल खळदकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली, त्याबद्दल सर्व शिक्षकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
शिष्यवृत्ती तज्ञ शिक्षिका सुकन्या धुमाळ यांनी याप्रसंगी शालेय उपक्रमासाठी आर्थिक स्वरूपात मदत दिली.शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन कांताराम शिंदे यांनी केले.
मुख्याध्यापक राहुल चातुर यांनी सर्व उपस्थितांचे यावेळी आभार मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 2 6 0
Users Today : 198
Users Yesterday : 503