Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

आगळे वेगळे रक्षाबंधन…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी
विश्व हिंन्दु परिषद मातृशक्ती,दुर्गावाहीनी शिरुर प्रखंड आयोजित
सेवा,सुरक्षा,संस्कार रक्षाबंधन सोहळा नुकताच साजरा करण्यात आला.
एक राखी सुरक्षेसाठी ,
एक राखी सेवेसासाठी,
तर एक राखी संस्कारांसाठी
या हेतुने या ही वर्षी
विश्व हिंन्दु परिषद बजरंगदल,मातृशक्ती
,दुर्गावाहिनी शिरुर प्रखंड तर्फे आज दिनांक २१/०८/२०२२ रविवार रोजी राखी बांधून साजरा करण्यात आला.
शिरुर पोलिस स्टेशन,शिरुर नगर पालिका कर्मचारी,
एस.टी बस स्टॅंण्ड व
श्री गोरक्षण पांजरपोळ संस्था येथील सर्व कर्मचारी बांधवांना औक्षण करुन मातृभक्ती,दुर्गावाहिनी शिरुर यांजकडुन सामाजिक समरस्ता,सलोखा जपण्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी श्री.जगदगुरु नरेंन्द्राचार्यजी महाराज सेवाकेंद्र शिरुर,
वैष्णव परिवार महिला मंडळ,
व प्रितम प्रकाश मातृशक्ती महिला,
शहरातील माता भगीनीणी देखील सहभाग घेतला.
सामाजिक समरस्ता म्हणुन मातृशक्ती दुर्गावाहिनी तर्फे रक्षाबंधनाचा उत्सव दरवर्षी मोठ्या जोमाने साजरा करण्यात येतो तसेच जनतेचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणारे पोलिस बांधव,सदैव सेवा देणारे एस.टी.कर्मचारी,शहरातील वातावरण,आरोग्य सुरक्षीत रहावे म्हणुन स्वच्छता करणारे शिरुर नगरपालिकेचे कर्मचारी
गोसेवा करणारे गोरक्षण पांजरपोळ येथील कर्मचारी यांना
बहिणीची उणिव भासु नये म्हणून मातृशक्ती,दुर्गावाहिनी मधील दुर्गा व सर्व संलग्न सेवाभावी संस्था यांनी राखी बांधुन हि उणिव दुर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही सामुहीक रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी उपस्थित
बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक अजिंक्य तारु,संजयज अडलिंग
विश्व हिंन्दु परिषदअध्यक्ष शिरुर प्रखंड,गणेश राक्षे
विश्व हिंन्दु परिषद शिरुर प्रखंड मंत्री,
सहमंत्री रोहन जामदार,
सुनिल ईंदुलकर
बजरंग दल संयोजक शिरुर प्रखंड,
गोरक्षा प्रमुख सागर परभणे,सहप्रमुख,प्रतीक शर्मा , महाविद्यालयाचे प्रमुख कु.ऋषीकेश गुजर, साप्ताहिक मिलन प्रमुख रेवणजी जगदाळे
कुणाल काळे,रोहीत कुसळे व इतर बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 1 0 4
Users Today : 12
Users Yesterday : 21