शिरूर प्रतिनिधी
गणेगाव दुमाला ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ.रोहिणी सुधीर निंबाळकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.
त्या अनुषंगाने बाभुळसर बू! च्या सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते, त्यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये गणेगाव विविध सहकारी सोसायटी संचालक प्रमोद गरुड,महेंद्र नागवडे मा.उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बाभुळसर, सुधीर निंबाळकर, अमोल भोसले मा.उपसरपंच गणेगाव,ऋषीं निंबाळकर राष्ट्रवादी युवा नेते,ज्येष्ठ नामदेव भाऊ निंबाळकर उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच म्हणाल्या गणेगाव ग्रामस्थांनी माझ्यासारख्या सामान्य महीलेल्या एवढ्या मोठ्या पदावरती काम करण्याची संधी दिली आहे , त्या संधीचा उपयोग मी गावातील शेवटच्या घटकातील व्यक्ती पर्यंत सर्व शासकीय लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहे व माझ्यावर टाकलेली जबादारी मी पुर्ण करेल.
यावेळी नवनिर्वाचित सरपंचांनी सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांचे त्यांच्या बाभुळसर गावातील चाललेल्या कामाविषयी चर्चा करून एक महिला सरपंच म्हणून कौतुक केले.
यावेळी ऋषी निंबाळकर यांनी या सत्कारा बाबत विशेष आभार मानले.
