स्वराज्य रक्षक फाउंडेशन व शंभू भक्त यांच्या कडून छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
दर वर्षी प्रमाणे,या वर्षी ही स्वराज्य रक्षक फाउंडेशन च्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन सभा पाचकंदील चौक येथे आयोजित करण्यात आली होती .


यावेळी महाराजांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .

यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पीआय संदेश केंजळे ,पी.एस.आय.नकाते ,पी एस आय दिलीप पवार,पी एस आय राहुल भागवत ,महिला पोलिस धनश्री जाधव,तृप्ती माकर, नगरसेविका स्वप्नाली जामदार ,शशिकला काळे,सविता बोरुढे ,उषा वाखारे,वैशाली साखरे, नगरसेवक उमेश शेळके ,मनसे शहराध्यक्ष आदित्य मैड कुंभार समाजाचे तालुकाध्यक्ष योगेश जामदार नितीन जामदार दादासाहेब घावटे नितीन गायकवाड बाळू महाराज जोशी निलेश नवले अनिल गायकवाड विजय नरके किरण देशमाने चैतन्य जामदार व अनेक शंभू भक्त यावेळी उपस्थित होते.

आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्रजी सानप ,लोक जागृती संघटनेचे अध्यक्ष रवींद्रजी धनक ,मा.नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर ,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल पांडे ,ॲड.प्रदीप बारवकर ,जनता दलाचे प्रदीप बारवकर यांनी मनोगत व्यक्त करत,संभाजी महाराजांच्या कार्याची ,त्यांच्या जीवनाची व त्यांनी आपल्या साठी बलिदान देताना,भोगलेल्या यातना व त्रास कशा सहन केल्या ,हे सांगत शंभू महाराजांच्या कार्याला उजाळा देत व समजातील सर्व नागरिकांनी ते समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले .

कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी लेंडे ,प्रफुल उबाळे ,शुभम जाधव ,सागर झाडगे ,गणेश हांडे व राहुल लेंडे यांनी केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 9 4 3 4
Users Today : 28
Users Yesterday : 92