Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

बालाजी इंग्लिश मिडियम स्कूलचे नाट्यछटा स्पर्धेत यश

Facebook
Twitter
WhatsApp

सरदवाडी प्रतिनिधी: दत्तात्रय कर्डिले
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बालाजी इंग्लिश मिडियम स्कूल हे नेहमी मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देते तसेच जिल्हा व राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सहभागासाठी प्रोत्साहित करते.
अशाच नुकत्या शिरूर मध्ये पार पडलेल्या बालरंग भूमी परिषद पुणे जिल्हा व निळू फुले अकादमी आयोजित ‘नट श्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धा 2024’ मध्ये विविध शाळातील एकूण 135 विद्यार्थी सहभागी झाले होते.
बालाजी इंग्लिश मिडियम स्कूलचे भावेश सांगळे, हर्षदा शिरसाट, सुरज पोकळे, अमेय भंडारी व तेजस्विनी चव्हाण या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नाट्यछटा सादर केल्यामुळे त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तर यातूनच तेजस्विनी चव्हाण हिची जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत निवड झाली आहे. नाट्यछटा स्पर्धेच्या अध्यक्षा सौ दिपाली शेळके यांनी बालाजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. तेजस्विनीने ‘परिवर्तन’ ही नाट्यछटा अतिशय उत्कृष्ट रीतीने सादर करून सर्वांची मने जिंकली. सुरेखाताई पुणेकर यादेखील स्पर्धेसाठी उपस्थित होत्या. पारितोषिक वितरण समारंभ हा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
शाळेचे प्राचार्य गणेश मिटपल्लीवार, उपप्राचार्या प्रणिता शेळके यांनी प्रशिक्षक साईनाथ टाले यांचे विद्यार्थ्यांवर घेतलेली मेहनत व चिकाटी यासाठी भरभरून कौतुक केले व तेजस्विनी चव्हाण हिला तिच्या पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.परिवर्तन ही उत्कृष्ट नाट्यछटा सादर केल्यामुळे जिल्हास्तरीय पातळीवर निवड

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21