Breaking News
बाभूळसर बुद्रुक येथील डॉ.पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय स्थानिक स्कूल कमिटी निवडणूक…… “खराडी एनएक्स’, ‘अप्पर खराडी’ नावांचा वापर थांबवा; वाघोलीतील गृहप्रकल्पांच्या जाहिरातींत तातडीने सुधारणा करा –विद्यमान आमदार माऊली आबा कटके पुणे महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांकडे लेखी मागणी; जाहिराती आणि कागदपत्रांमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करण्याचे आदेश देण्याची मागणी शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांच्या उपस्थितीत वाघोलीत पोलिओ लसीकरण. शिरूर मध्ये पुन्हा सिलेंडर चा तुटवडा की….. घोटाळा? मांडवगण फराटा येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ; सुजाता भाभी पवार यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस संतोष माणिकराव नागवडे यांना जागतिक स्तरावरील ‘CEO CLUB 2026’ पुरस्काराने सन्मानित दक्षिण कोरियात स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या वतीने गौरव; ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषाने कोरिया दुमदुमला

बाभूळसर बुद्रुक येथील डॉ.पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय स्थानिक स्कूल कमिटी निवडणूक……

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी . संतोष साळुंके
बाभूळसर बुद्रुक येथील डॉ.पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय स्थानिक स्कूल कमिटी निवडणूक नुकतीच पार पडली.अध्यक्षपदी संजय आत्माराम नागवडे पाटील,तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय वाल्मीकराव नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी म्हसोबावाडी येथील विद्यालयाला अगदी सुरुवाती पासून योगदान असून भविष्यातही विद्यालयाच्या गुणवत्तेसाठी, दर्जेदार शिक्षण,आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी उंचावण्यासाठी आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय नागवडे पाटील आणि उपाध्यक्ष दत्तात्रय नागवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

 

बाभुळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला, मांडवगण फराटा या त्रिवेणी संगमावर डॉ. पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा ,उच्चशिक्षित शिक्षक स्टाफ ,कर्मचारी वृंद व कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका श्रीमती उषा गावडे मॅडम , परिक्रमा शैक्षणिक संकुल उपाध्यक्ष हनुमंत पाटोळे व शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब नागवडे,मा चेअरमन सुनील दादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय कार्यरत असून स्थापनेपासून आजपर्यंत या विद्यालयाने एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये १००% निकालाची परंपरा सातत्याने चालवली आहे.

स्थानिक स्कूल कमिटी खालीलप्रमाणे :

अध्यक्ष संजय आत्माराम नागवडे, उपाध्यक्ष दत्तात्रय वाल्मीक नागवडे , मार्गदर्शक सदस्य रमेश कल्याण पाटोळे, सदस्य सुभाष पोपट ,मनोहर मचाले, अमोल राजेंद्र नागवडे ,गणेश फत्तेसिंग नागवडे ,नानासाहेब कोंडीबा नागवडे ,कविता पाटोळे, शैलजा ताई शरद नागवडे,संगीता नागवडे, सारिका ढमढरे, मोहिनी रणदिवे,अल्लाउद्दीन अलवी (पत्रकार)सदस्य नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे सचिव म्हणून मुख्याध्यापिका श्रीमती उषा गावडे मॅडम यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रास्ताविकामध्ये उषा गावडे मॅडम यांनी या सदस्यांच्या निवडीनंतर सदस्यांना विद्यालयाच्या प्रस्तावित कामांचा आढावा वाचून दाखवला. यावेळी विद्यालयाचा विद्यार्थी पट आणि शिक्षकांनी सांभाळलेली जबाबदारी अतिशय कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच आपल्या मनोगतामध्ये शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब नाना नागवडे यांनी विद्यालयाला येणाऱ्या तांत्रिक बाबी सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू, तसेच पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येक पालकांचा घरी जाऊन विद्यार्थ्यांना डॉ पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालयामध्ये जास्तीत जास्त पट वाढीसाठी विनंती करू असे यावेळी सांगितले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 9 1 9 2
Users Today : 65
Users Yesterday : 161