Breaking News
शिरूर तालुका ठरतोय का गुन्हेगारांचा बालेकिल्ला..? श्री.डी.एन.ताठे माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिनाची उत्साहात सुरुवात…..! विश्रांतवाडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शिरूर तालुका नाभिक संघटना आक्रमक; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी! शिरूर तहसीलदार व शिरूर पोलीस स्टेशनला निवेदन; पोस्को कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी पुणे MPSC सत्याग्रह मांडवगण फराटा येथील यश वेठेकर CBSE आर्मी पब्लिक स्कूल राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णधार. सीबीएसई नॅशनल कबड्डी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल पुणे यू-१७ संघाचे कर्णधारपद भूषवत कांस्यपदकावर मोहर वडगाव मावळ: पैसा फंड ते विशाल लॉन्स रस्ता बनला ‘डेथ ट्रॅप’; खड्डे आणि कचऱ्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात!

शिरूर तालुका ठरतोय का गुन्हेगारांचा बालेकिल्ला..?

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी:- दत्ता हिरामन कर्डिले.

सण जवळ येत आहेत आणि आता फटाक्यांच्या आवाजा ऐवजी गोळीबाराचे आवाज सध्या तालुक्यात घुमत आहेत.
शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत गुन्हेगारी चे प्रमाण वाढले आहे.खून,सोनसाखळी चोरी,चोऱ्या,घरफोडी मारामारी ह्या घटना सध्या वाढताना दिसत आहे.गाड्यांच्या फूल काळ्या कलर च्या काचा,बिगर नंबर प्लेट च्या गाड्या याचं प्रमाण पण वाढत आहे.

शिरूर तालुक्यात सध्या गुन्हेगारी ने डोक वर काढल आहे.आज शिरूर सारख्या तालुक्यात दिवसा खून,चोरी,मारामारी चे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत.किरकोळ किरकोळ कारणांमुळे आज गुन्हे घडत आहे.छोट्या छोट्या गोष्टीवरून आज पिस्तौल आणि हत्यारे काढली जातात.ही पिस्तौल येतात कुठून? ही हत्यारे येतात कुठून याच्या मुळाशी गेले तर या घटना थांबवल्या जाऊ शकतात. यांच्यावर कडक कार्यवाही केली तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे थांबू शकतात.आज समाजात गुन्हेगारांकडे तसेच अल्पवयीन मुलांकडे सहज प्रकारे हत्यारे मिळत असल्याचे चित्र दिसत आहेत.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे यात आजकाल अल्पवयीन मुलांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
आज सर्व सामान्य माणूस प्रश्न करतोय कि खरच शिरूर तालुका गुन्हेगारांचा बाले किल्ला बनलाय का…?
आज शिरूर मधे कोणीच सुरक्षित नाही का?
असे प्रश्न शिरूर तालुक्यातील सामन्य जनता विचारात आहे.

आमचा शिरूर तालुका पुन्हा एकदा गुन्हेगारी मुक्त होइल का?

अजुन किती दिवस जीव मुठीत धरून जगायच?असे बरेच प्रश्न सामान्य माणसाच्या मनात येत आहेत.
आमचा शिरूर तालुका पुन्हा एकदा सुरक्षित शिरूर तालुका बनल का……?

शिरूर तालुका गुन्हेगारांचा बालेकिल्ला यावरून आता
शिरूर तालुका कायद्याचा बालेकिल्ला बनल का….?
या कडे आता सर्वांचे लक्ष् लागून आहे…..

“आमचं शिरूर सुरक्षित शिरूर.”आहे का?

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 4 5 4 9
Users Today : 6
Users Yesterday : 113