Breaking News
पुणे MPSC सत्याग्रह मांडवगण फराटा येथील यश वेठेकर CBSE आर्मी पब्लिक स्कूल राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णधार. सीबीएसई नॅशनल कबड्डी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल पुणे यू-१७ संघाचे कर्णधारपद भूषवत कांस्यपदकावर मोहर वडगाव मावळ: पैसा फंड ते विशाल लॉन्स रस्ता बनला ‘डेथ ट्रॅप’; खड्डे आणि कचऱ्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात! प्रथमेश अशोक ढाकणे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…. अंगारकी चतुर्थीनिमित्त म्हसोबावाडीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी श्रद्धा; एक हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ शिरूर मध्ये हॉटेल चालक महिलेस बेदम मारहाण…..

पुणे MPSC सत्याग्रह

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी :- सागर पवार

“आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून हटवूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे!”

 

पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहामध्ये सहभागी होऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्या व अडचणी समजून घेतल्या.

स्पर्धा परीक्षांसाठी अनेक वर्षे प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड होता कामा नये. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह असणे ही विद्यार्थ्यांची रास्त अपेक्षा आहे.

विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना केवळ आश्वासनांनी नव्हे, तर ठोस निर्णय आणि निष्पक्ष चौकशीच्या माध्यमातून उत्तर मिळाले पाहिजे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून हटवून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनस्थळावरून विद्यार्थ्यांच्या वतीने सरकारकडे केली.

यावेळी अभिजित दिपके, रोहितदादा पवार यांच्यासह विद्यार्थी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या भविष्याच्या प्रश्नांसाठी आवाज कायम बुलंद राहील!

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 3 9 6 2
Users Today : 2
Users Yesterday : 31