शिरूर प्रतिनिधी:
शिरूर ग्रामीण (रामलिंग ग्रामपंचायत) मधील बाबुराव नगर येथील “श्री साई लाईफस्टाईल सोसायटी मध्ये आज सकाळी भटक्या कुत्र्यांनी तीन वर्षीय मुलीला चावल्याने ती जखमी झाली,सोसायटी मधील महिला व पुरुषांनी तिला शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन गेले असता, डॉ.बत्ते यांनी प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारांसाठी पुणे येथे पाठवण्यास मदत केली.
रस्ते नीट नसल्याने महिला व शाळकरी मुले कायमच चिखलात घसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे व स्ट्रीट लाईट नसल्यामुळे बाबुराव नगर मध्ये महिला सुरक्षित नाहीत ,अशी तक्रार येथील महिला करत आहेत.काही दिवसांपूर्वी येथील महिला बरोबर छेडछाड झाल्याची घटना घडल्याची चर्चा आहे.

या सर्व घटनाकडे रामलिंग ग्रामपंचायत ,सदस्य,सरपंच , ग्रामसेवक फक्त बघ्यांची भूमिका घेत आहेत का?
आजच्या घटनेमुळे जे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,त्यावर ग्रामपंचायत काय निर्णय घेते व भटक्या कुत्र्यांसाठी काय उपाययोजना करते?






Users Today : 4
Users Yesterday : 99