प्रतिनिधी :संतोष साळुंके
रांजणगाव सांडस मधील शितोळे वस्ती, मळई वस्ती कडे जाणारा रस्ता पूर्णपणे पुराच्या पाण्यात गेल्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

तब्बल पाऊण किलोमीटर पर्यंत हा रस्ता पाण्याखाली गेल्याने तेथील रहिवाशांनी या रस्त्यावर साकव पद्धतीचा पूल बांधावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे,या दोन्ही वस्त्या पुराच्या पाण्याने वेढा टाकल्याने अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले.पिण्याचे पाणी आणायचे म्हणले तरी गावातच जावे लागते,या शिवाय शालेय विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होते.

वृद्ध,आजारी माणसांना हॉस्पिटल मधे जायचे असेल तरी दोन दिवस पाणी ओसरे पर्यंत वाट पाहावी लागते
अनेक वर्षापासून येथील रहिवाशी पूरपरिस्थिती निर्माण झाली की या संकटांना सामोरे जातात.

पुणे ग्रामीण न्युज शी बोलताना संदीप शितोळे म्हणाले की अनेक वर्षा पासून ,अनेक वेळा निवेदन देऊन ,मागणी करूनही ,अद्याप कुणीच दखल घेतली नाही.

लवकरात लवकर प्रशासनाने होणाऱ्या या समस्या , असुविधा ची दखल घेऊन साकव पूल तयार करावा अशी मागणी माजी उपसरपंच अजित शितोळे,माजी सरपंच सुदाम रणदिवे, रामकृष्ण रणदिवे,माजी चेअरमन सोपान शितोळे,मोहनराव शितोळे यांनीं केली आहे.




Users Today : 3
Users Yesterday : 94