मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके
असे म्हणतात ना “नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी तार्यांची! आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयांना मिळतील सत्तर!!,या कवितेच्या ओळीप्रमाणे सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले आणि असामान्य कामगिरी करणारे निर्वी गावचे सुपुत्र कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांनी मुंबई येथे झालेल्या नेमबाजी स्पर्धेत दोन रजत प दकांची कमाई करून आपल्या विद्यालयाचे आणि गावाचं नाव राज्य पातळीवर झळकवलं याबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच भविष्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यात आल्या.

वडिल रखमा कोळपे यांनी देशाची सेवा करण्यासाठी आपल्याला आर्मी मध्ये भरती व्हायचं हे स्वप्न पाहिलं होतं, मात्र ते पूर्णत्वाला गेलं नाही,म्हणून आपल्या मुलाने या क्षेत्रामध्ये जावं ही त्यांच्या मनातील इच्छा आपला मुलगा पूर्ण करेल हा उद्देश मनात ठेवून त्यांनी आपला मुलगा नेवासा येथील सैनिकी शाळेत घातला. येथील शाळेमध्ये प्रशिक्षण घेत असताना नेमबाजीत स्पर्धेत शाळा स्तरीय स्पर्धेत भाग घेतला. त्यामुळे शिक्षकांनी या विद्यार्थ्यांमध्ये लक्ष अचूक भेदण्याचा गुण आहे, हे ओळखून पुढील स्पर्धांमध्ये या विद्यार्थ्याला पाठवण्याचा निर्णय घेतला. तसे प्रशिक्षण दिले. आपल्या प्रशिक्षकांनी दाखवलेल्या विश्वासावर खरं उतरत असताना या विद्यार्थ्याने गेल्या तीन चार वर्षांपासून अनेक पथकांची कमाई आपल्या विद्यालयासाठी करून दिली.

निश्चितच या मुलाच्या खर्चाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या पालकांनी सांगितलं की एक एक बंदूक जवळजवळ तीन लाखापर्यंत आहे. कालच्या स्पर्धेसाठी आणलेली बंदूक ही दोन लाख रुपये महिना भाडे,अशी आणली होती. निश्चित खर्चिक असलेला खेळ परंतु मुलाने दाखवलेली रुची आणि पालकांनी त्यासाठी दिलेली प्रेरणा यांचा मेळ या कुटुंबाने घातलेला दिसतो.नक्कीच पुढचा काळ हा बिकट आहे, पण तरीसुद्धा खंबीरपणे साथ देण्याची तयारी पालकांनी दाखवलेली आहे.ग्रामस्थांनी ही हातभार लावण्याची ग्वाही कार्यक्रमाच्या निमित्ताने दिली.
विशेषतः निर्वी गावचे भूषण विक्रीकर विभागाचे सहआयुक्त संदीप पवार साहेब यांनी या मुलाच्या खेळासाठी सहकार्य केलं आहे आणि याही पुढच्या काळामध्ये सहकार्य करणार आहे असे उद्योजक कमलेश बुराडे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले.
या प्रसंगी मा. सरपंच तात्यासाहेब खंडेराव सोनवणे यांनी या विद्यार्थ्यांसाठी गाव म्हणून जी जबाबदारी आमच्यावर येईल ती जबाबदारी आम्ही पूर्ण करू आणि गावचे नाव मोठे होत असेल तर नक्कीच त्यासाठी हातभार लावू अस आश्वासन कुटुंबाला व उपस्थितांना दिले.
या सत्कार समारंभ प्रसंगी मा. पंचायत समिती सदस्य रामभाऊ कदम, सरपंच भाग्यश्री कमलेश बोराडे, मनीषा शरद पवार, मा उपसरपंच अनिल चंद्रकांत कांबळे, प्रकाशबापू पवार, वैभव पवार, शरदराव पवार, शफिक पठाण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.





Users Today : 10
Users Yesterday : 148