मांडवगण मध्ये प्रा.संतोष परदेशी सर लिखित.यांच्या गावपण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा.दिमाखात प्रतिनिधी.संतोष साळुंके

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंखे
मांडवगण फराटा येथे व्याख्याते प्राध्यापक संतोष परदेशी सर लिखित गाव पण पुस्तकाचा शानदार प्रकाशन सोहळा संपन्न.

तालुक्यातील अग्रगण्य बाजारपेठ मांडवगण फराटा येथील प्रसिद्ध व्याख्याते , तसेच श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशाला प्राध्यापक संतोष शामराव परदेशी सर लिखित गाव पण पुस्तक प्रकाशन सोहळा उद्घाटन पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सर (प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले .यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मा.शेखर गायकवाडसो. ( अतिरिक्त महासंचालक यशदा पुणे), विशेष सरकारी वकील सुरेश लगड, निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोद मोरे,राणीताई फराटे जगताप (गट विकास अधिकारी श्रीगोंदा), सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ, पोलीस उपनिरिक्षक बाळासाहेब शिंदे, सहाय्यक अधिकारी वित्त विभाग राजेंद चांदगुडे , हनुमंत चांदगुडे सर (पाठ्यपुस्तक कवी), अभिनेते सचीन गवळी,ऊर्जा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश शेठ कुतवळ ,वाघेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव पाटील फराटे ,शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना संचालक सुभाष काका शिंदे , मदनदादा फराटे, सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे,मा संचालक भानुदास फराटे माजी संचालक दत्तात्रय फराटे ,मा संचालक शंकरराव फराटे इनामदार, मा चेअरमन शिरूर पंचायत समिती सभापती दादासाहेब कोळपे , संचालक नरेंद्र माने, श्रीरंग हॉस्पिटलचे डॉक्टर धनंजय शिंदे पाटील, डॉक्टर प्रेम कुमार भट्टड,पंचायत समिती सदस्या संगीता किशोर फराटे , ,पंचायत समिती मा सदस्य राजेंद्र गदादे ,लक्ष्मण फराटे, ,मा. सरपंच पोपटराव निंबाळकर , हभप सर्जेराव फराटे, भाऊमामा जगताप,शिरगाव काटा गावच्या सरपंच मनिषा जाधव, सादलगावचे सरपंच खंडेराव मिठे , पिंपळसुटी सरपंच निर्मला फलके, पोपटराव निंबाळकर,मा पुणे जिल्हा अध्यक्ष भाजपा सचिन मचाले, महेंद्र नागवडे रमेश परदेशी , शामराव परदेशी,मेजर सुरेश परदेशी , किसन परदेशी आदी उपस्थित होते.

यावेळी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सर यांचा मांडवगण फराटा फराटा गावचे ह भ प सर्जेराव फराटे गुरुजी ,तसेच सादलगावचे ज्येष्ठ भाऊमामा जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर फराटे यांनी केले, यावेळी बोलताना सुधीर फराटे यांनी प्राध्यापक संतोष परदेशीसर लिखित गावपण या पुस्तकातील थोडक्यात सारांश व्यक्त केला. तसेच मनोगतामध्ये श्री वाघेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव पाटील फराटे, दादासाहेब कोळपे यांनी परदेशी सरांचा लहानपणीचा किस्सा सांगितला. तसेच गिरीश भांडवलकर परिस पब्लिकेशन ,तसेच डॉक्टर सुनील धनगर (शब्द जादूगर सुप्रसिद्ध व्याख्याते )आणि चित्रकार सारंग रामदास फराटे (मुखपृष्ठ) यांचे कौतुक केले. अध्यक्षस्थानी लहाने सर यांनी बोलताना सांगितले की मोबाईल वापरापासून होणारे दुष्परिणाम तसेच शरीरासाठी पाळावयाची पथ्य हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे असे सविस्तर स्पष्टीकरण यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा परदेशी, सुनील धनगर, सोपान वायाळ यांनी केले तर आभार लक्ष्मण फराटे यांनी मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 0 2 8 0
Users Today : 3
Users Yesterday : 180