“गाई आपली माता”” मानतो याची प्रचिती आज शिरूर मध्ये आली…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर शहरात आज दि.२३/०३/२०२६ रोजी गाईला आपण माता मानतो,जीच्या अंगात ३६ कोटी देव देवतांचा समावेश आहे,अशा मृत गाईला असेच उघड्यावर फेकून न देता ,हिंदू शास्त्रीय पद्धतीने अंत्यसस्कार करत एक वेगळा संदेश आज प्रभाग क्रमांक ७ करंजुले नगर मधील नगरसेवक सागर नरवडे यांनी दिला आहे.

त्यांच्या प्रभाग मधील काही लोकांनी त्यांना फोन वर गाई मृत असल्याचे सांगितले असता ,त्यांनी लगेच नगराध्यक्ष,स्वच्छता सभापती व नगरसेविका यांना गायी बद्दल माहिती दिली व स्वतः तिला पांजरपोळ येथे घेऊन जात तिच्यावर अंत्यसस्कार केले.

सागर नरवडे यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत असून,समाजाला एक प्रेरणा मिळाली आहे.

 

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 9 6 9 0
Users Today : 2
Users Yesterday : 23