शिरूरमध्ये गोहत्या करणारा सराईत गुन्हेगारअब्दुलहक कुरेशी एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत जेरबंद..

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूरमध्ये गोहत्या करणारा सराईत गुन्हेगार एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत जेरबंद; अकोला कारागृहात रवानगी

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर परिसरामध्ये अवैधपणे गोहत्या आणि गोमांस विक्रीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या एका सराईत आणि धोकादायक गुन्हेगारावर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

अब्दुलहक जलील कुरेशी (शेख), वय ४६ वर्षे, याला महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड व इतर विघातक कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये (MPDA) स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्याची रवानगी अकोला मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला
अब्दुलहक कुरेशी हा मूळचा अहिल्यानगर (अहमदनगर) येथील असून सध्या शिरूरमधील खाटीक आळी भागात वास्तव्यास होता.

यापूर्वी ही त्याच्यावर जनावरांना ठार मारणे, विकलांग करणे आणि कारवाई दरम्यान लोकसेवकांना (शासकीय कर्मचाऱ्यांना) धमकावून त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे असे भारतीय न्याय संहिता व जुन्या भारतीय दंड विधानानुसार एकूण ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याचे समोर आले होते.

प्रशासकीय कारवाईचा आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी या गुन्हेगाराचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रस्तावाचे गांभीर्य लक्षात घेऊन ९ मार्च २०२६ रोजी या गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली. या पथकांनी अब्दुलहक कुरेशीचा शोध घेऊन त्याला १२ मार्च २०२६ रोजी ताब्यात घेतले आणि तातडीने अकोला मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी केली.
कारवाईत सहभागी टीम
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, पोलीस हवालदार गणेश धनवे, मंगेश थिगळे आणि संजू जाधव , तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, परशुराम सांगळे, अक्षय कळमकर आणि इतर पोलीस अंमलदार यांनी कारवाई केली,
या कारवाईमुळे शिरूर परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 9 1 1 3
Users Today : 21
Users Yesterday : 281