कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे) (पुणे) येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप रामदास ढाकुलकर यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिरूर तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल सुरेश वाळके पाटील आणि शिरूर तालुका अध्यक्ष अमोल माळवदकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

नव नियुक्त शिरूर तालुका कार्याध्यक्ष संदीप ढाकुलकर यांनी या प्रसंगी बोलताना शोषित, पीडित, वंचित, दिव्यांग, कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध स्तरातून कौतुक व्यक्त केले जात आहे.






Users Today : 121
Users Yesterday : 898