[कै.”दत्ताभाऊंची निष्ठा आणि सणसवाडीची एकी विसरण्यासारखी नाही” – ॲड. अशोकबापु पवार]
सणसवाडी प्रतिनिधी :
राजकारणात पदे तात्पुरती असतात, पण निष्ठावान माणसे आयुष्यभर सोबत राहतात, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिरूर तालुक्यातील सणसवाडी गाव होय. येथील ग्रामस्थांनी जपलेल्या निष्ठा, एकी आणि नेकीच्या परंपरेचा गौरव माजी आमदार ॲड. अशोकबापु पवार यांनी केला. निमित्त होते नवनिर्वाचित सरपंच शशिकला रमेश सातपुते यांच्या सत्कार समारंभाचे. शशिकला सातपुते यांची सरपंचपदी बिनविरोध निवड होताच, पवारांनी गावात उपस्थित राहून गावकऱ्यांच्या ‘एकी’ला सलाम केला.
सणसवाडी माझे कुटुंब:
‘सणसवाडी माझे कुटुंब, इथले लोक माझी ताकद’ :
सत्कार समारंभात बोलताना माजी आमदार ॲड. अशोकबापु पवार “सणसवाडी हे माझे कुटुंब आहे. इथले लोक माझी ताकद आहेत,” असे सांगताना ते म्हणाले, “या गावाने मला प्रत्येक सुख-दुःखात साथ दिली. या निष्ठावान ग्रामस्थांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही. राजकारणात अनेक चढ-उतार येतात, पण पदावर असताना आणि पद नसतानाही जे लोक प्रामाणिकपणे सोबत राहतात, तेच खरे सहकारी असतात.”

आदर्श ‘रोटेशन’ प्रणालीतून साधली प्रगती :

सणसवाडीच्या राजकीय परिपक्वतेचा विशेष उल्लेख करत पवार म्हणाले, “येथील लोकांनी कोणत्याही प्रकारचा विरोध किंवा अडथळा न आणता, ठरलेल्या वेळी प्रत्येक सहकाऱ्याला सरपंच आणि उपसरपंचपद दिले. यामुळेच या गावाची प्रगती झाली आहे. लोकांच्या कल्याणासाठी व विकासासाठी राजकारण कसे करावे, याचा आदर्श या गावाने घालून दिला आहे. ही एकी आणि प्रामाणिकता सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”
विकासाच्या वाटचालीत पवारांचे योगदान
आपल्या आमदारपदाच्या काळात गावाला मिळालेल्या विकासकामांची आठवण पवारांनी करून दिली. त्यांच्या प्रयत्नातून गावात रस्त्यांचे सुधारणे, सांडपाणी गटार लाईन, आणि सोलर पथदिवे यांसारखी महत्त्वाची विकासकामे झाली, ज्यामुळे सणसवाडीची ओळख बदलली. गावाचा हा सर्वांगीण विकास लोकांच्या एकीचा आणि निष्ठेचाच परिणाम असल्याचे त्यांनी नमूद केले.
कै़ दत्ताभाऊ नामदेव हरगुडे यांच्या निष्ठेची भावनिक आठवण :

यावेळी माजी उपसरपंच कै.दत्तात्रय (दत्ताभाऊ) हरगुडे यांच्या आठवणींनी उपस्थितांना गहिवरून आले. “दत्ताभाऊ एकनिष्ठ, मनमिळाऊ आणि लोककल्याणासाठी झटणारे कार्यकर्ते होते. त्यांची कमतरता आजही तीव्रतेने जाणवते,” असे सांगताना पवार म्हणाले, “दत्ताभाऊ म्हणजे दिलदार मनाचा एकनिष्ठ सहकारी म्हणून सणसवाडी आणि माझ्या कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निष्ठेची गावाला सदैव ऋणी राहील.”
शशिकला सातपुते यांची बिनविरोध निवड ही गावातील विश्वास आणि प्रामाणिकतेचे प्रतीक असून, त्यांच्या नेतृत्वाखालील आगामी काळात गावाला नवी गती मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

उपस्थित मान्यवर:

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडितआप्पा दरेकर, शिरूर बाजार समितीचे माजी संचालक दत्ताभाऊ हरगुडे, सणसवाडीच्या मा़जी सरपंच रूपाली दरेकर, संगीता हरगुडे. , शिरूर काँग्रेस अध्यक्ष वैभव यादव , माजी उपसरपंच विजयराज दरेकर, माजी सरपंच रमेश सातपुते, उद्योजक दगडू दरेकर.नवनाथ हरगुडे.l, माजी चेअरमन सुहास दरेकर, ग्माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल दरेकर, रामदास दरेकर, उद्योजक सुभाष दरेकर , विठ्ठल दरेकर, संदीप भुजबळ , निलेश दरेकर प्रशांत दरेकर, सुखदेव दरेकर ,प्रवीण वाखारे ,शाम दरेकर, प्रदीप म्हेत्रे ,संतोष शेळके, श्री लालू दरेकर , बाळकृष्ण दरेकर, गणेश हरगुडे ,अशोक करडे ,पंढरीनाथ गोरडे अनिल गोटे सर आणि सणसवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.







Users Today : 6
Users Yesterday : 7