शिरूर प्रतिनिधी:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन बॉल-बॅडमिंटन (मुले) स्पर्धा दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली.

या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील एकून ०७ महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले होता. त्या प्रमाणे एकून ७० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य मा. डॉ. के. सी. मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित जनहित आघाडीतून अनेक उमेदवारी अर्ज दाखल
या उद्घाटन प्रसंगी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव प्रा. डॉ. अमेय काळे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. डि. एच. बोबडे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आप्पासाहेब चव्हाण, डॉ. सुरेश शिंदे इत्यादी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. के. सी. मोहिते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिमखाना विभाग प्रमुख डॉ. डी. एच. बोबडे यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी महाविद्यालय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांची माहिती दिली. आंतर महाविद्यालयीन बॉल-बॅडमिंटन (मुले) स्पर्धा प्रथमच महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यास महाविद्यालयातील जिमखाना विभाग नेहमीच आग्रेसर आसतो. असे त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव प्रा. डॉ. अमेय काळे यांनी स्पर्धे बद्दल माहिती दिली व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य मा. डॉ. के. सी. मोहिते यांनी खेळाने शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक बळकटीकरण होते. तसेच विविध कौशल्यांचा विकास होतो असं आपल्या भाषणात नमुद केले तसेच खेळाडूंनी हार न मानता खंबीरपणे आपले खेळाचे कौशल्य पणाला लावावे असे आवाहन केले. तसेच स्पर्धेचे उद्घाटन झाले असे जाहीर केले. या स्पर्धा संपल्यावर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला. एस. एम. जोशी महाविद्यालय हडपसर यांना प्रथम क्रमांक मिळवला, तर वाघीरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवड यांना द्वितीय, तर अण्णासाहेब मगर महाविदयालय, हडपसर यांना तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच या स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयातील बॉल बॅडमिंटन संघातील यशवंत पवार (F. Y. B. Com) या खेळाडूची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागीय संघात निवड झाली. विजेत्या खेळाडूना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव, जिमखाना विभाग प्रमुख डॉ.डि.एच.बोबडे, यांनी पुष्पगुच्छ देऊन विजयी खेळाडूचे अभिनंदन आणि कौतुक केले.
नियोजन साठी विशेष प्रयत्न:
सदर स्पर्धेचे यशस्वी नियोजन करण्यासाठी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, प्रसिद्ध उद्योगपती, महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, व प्राचार्य डॉ.के.सी. मोहीते यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ अप्पासाहेब चव्हाण यांनी केले तर शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. गणेश गव्हाणे यांनी आभार मानले.






Users Today : 4
Users Yesterday : 16