Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

तळेगाव न्हावरा रोडवरील तिरंगा हॉटेल प्रकरणातील, सात वर्षाच्या मुलीला अन्न औषध प्रशासनाकडून न्याय मिळणार का?

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यातील तळेगाव न्हावरा रोडवरील हॉटेल तिरंगा येथे दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दोन युवक व एका सात वर्षांच्या मुलीला दिलेले मासे सडलेले असल्याचे उघड झाले आहे. माशांचा उग्र वास येत असल्याचे लक्षात आल्यानंतर युवकाने ते मासे हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या इतर ग्राहकांना दाखवले असता अनेकांनी त्याचा वास घेतल्यानंतर ते खराब असल्याची पुष्टी दिली होती.

घटनास्थळी त्या वेळच्या परिस्थितीचे व्हिडिओही उपलब्ध झाले आहेत, ज्यात काही युवाक मासे खराब असल्याने जेवण तसेच टेबलवर सोडून जात असताना त्यांची प्रतिक्रिया व्हिडिओमध्ये चित्रीकरण करण्यात आली आहे

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
सदर प्रकरणाची तक्रार नोंद झाल्यानंतर, दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाने तत्काळ कारवाई करत फिश तवा फ्राय व पनीर यांचे नमुने घेऊन ते राज्य आरोग्य प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठवले असल्याचे सहाय्यक आयुक्त–अन्न व औषध प्रशासन, पुणे यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

अन्नपदार्थांमध्ये काहीही संशयास्पद किंवा बेसाळ आढळल्यास १८००-२२-२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क करण्याचे आवाहनही सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

नागरिकांमध्ये चर्चा व प्रश्नचिन्हे:

घटनेनंतर शिरूर तालुक्यात तीव्र चर्चा रंगल्या असून नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आजपर्यंत अनेकांना सडलेले, अळ्या असलेले, किंवा मुदत संपलेले पदार्थ मिळत असून काहींनी तक्रारीही केल्या. पण विभागातील अधिकारी जेव्हा तपासणीस येतात, तेव्हा तक्रारदारांकडे असलेला नमुना का घेत नाहीत? तेथील नमुना समोर ठेवून हॉटेल किंवा दुकानावर तात्काळ कारवाई का होत नाही?”

341b4926-1ad9-468c-8a77-9aed108be08b

नागरिकांच्या मते

तक्रारदाराकडे असलेला खरा नमुना न घेणे,

केवळ हॉटेलमधून घेतलेल्या नमुन्यावर अवलंबून राहणे,

तपासणी व अहवाल येईपर्यंत कारवाईचा विलंब

यामुळे अनेकदा कारवाईची तीव्रता कमी होते आणि हॉटेलवाल्यांना संरक्षण मिळाल्यासारखे दिसते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांचा आग्रह : “कडक कारवाई व्हावी!”

विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याला हानीकारक अन्न देणे हा गंभीर गुन्हा असल्याने नागरिकांनी हॉटेल मालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तसेच यापुढे तक्रारदाराकडे असलेला मूळ नमुना तपासात समाविष्ट करण्यात यावा,

प्रत्येक घटनेवर स्पॉट-पंचनामा करणे,

अशा हॉटेल्सची परवाने तपासून आवश्यक असल्यास रद्द करणे

न्याय मिळणार का?

अन्न औषध प्रशासन त्या सात वर्षाच्या मुलीला न्याय मिळवून देणार की हॉटेल मालकाला पाठीशी घालणार

राज्य प्रयोगशाळेचा अहवाल येणे आणि FDA ची पुढील कारवाई हे या प्रकरणातील निर्णायक टप्पे ठरणार आहेत. विशेष म्हणजे, व्हिडिओ पुरावे, साक्षीदारांचे म्हणणे आणि तक्रारदाराकडे असलेला मूळ नमुना हे सर्व दस्तऐवजीकरणात सामील झाल्यास सात वर्षांच्या मुलीसह तक्रारदारांलां न्याय मिळण्याची शक्यता अधिक आहे, असे नागरिकांचे मत आहे.

प्रशासन आता किती कडक पावले उचलते, याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 9
Users Today : 7
Users Yesterday : 21