घोडेगाव (ता. आंबेगाव) : दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी इन्फोटेक कॉम्प्युटर्स, घोडेगाव येथे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये संगीत खुर्ची, फुगे फुगवणे, दांडिया, फुगडी, भोंडला यांसह अनेक खेळ घेण्यात आले. प्रत्येक खेळात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नवरात्रीचा आनंद लुटत आपली कला व कौशल्य सादर केली. सेंटरमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले होते.
संस्थेचे संस्थापक सतीश खिंवसरा व सुवर्णा खिंवसरा मॅडम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांनी सांगितले की, “शैक्षणिक अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, टीमवर्क आणि सर्जनशीलता वाढीस लागते.”
एमकेसीएल मार्फत सेंटरमध्ये एमएस-सीआयटी व क्लिक यांसारखे संगणक कोर्सेस राबवले जातात. शैक्षणिक उपक्रमांसोबतच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या सेंटरमध्ये अभ्यासाबरोबरच इतर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.
आयोजकांचे आभार:
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी व पालकांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. “अशा उपक्रमांमुळे आमच्यात आत्मविश्वास वाढतो व शिकण्याची मजा दुप्पट होते. आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये जुन्या व नवीन पिढीतील संवाद साधण्यासाठी आणि भविष्याबद्दल विचार करण्यासाठी संगणक ज्ञानासोबतच AI म्हणजेच Artificial intelligence technology आणि इतर Technologie चे ज्ञान व त्याचा योग्य वापर या बद्दल मार्गदर्शन केले जाते. तसेच सायबर सिक्युरिटी बद्दल देखील आम्हाला माहिती दिली जाते.”, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
अनेकांनी मनोगत व्यक्त केली:
तसेच स्नेहा घुले, स्नेहल असवले, सुकन्या देशमाने, कल्याणी शेंडे, कीर्ती मदगे, अनुष्का पारधी, दिपाली बांबळे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि कार्यक्रमाचे आभार काजल वाबळे मॅडम यांनी केले. अशा रीतीने कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला.
विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल सतिश खिंवसरा सरांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
