कारेगाव प्रतिनिधी:अमोल कोहकडे
कारेगाव ता.शिरूर जि. पुणे येथील दिव्यांग संघटनेची कार्यकारिणी प्रहार दिव्यांग संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष नारायण नवले आणि पुणे जिल्हा संघटक भास्कर गवारे ह्यांच्या मार्गदर्शनाने तयार करण्यात आली .
कारेगाव शाखेचे अध्यक्ष म्हणून नंदकुमार नवले ,तर महिला अध्यक्ष म्हणून आशाताई मासळक ह्यांची निवड झाली .
या प्रसंगी उपाध्यक्ष निलेश जगताप , महिला उपाध्यक्ष शोभा दुधाडे, सचिव संताजी तळेकर , संघटक सचिव सुमित ओस्तवाल , पुष्पा नवले , मिडिया प्रसिद्धी प्रमुख अमोल कोहकडे , कार्याध्यक्ष धनंजय कोहकडे , खजिनदार निलम नवले , संपर्क प्रमुख भागीनाथ जगताप , चंद्रकला नवले , मार्गदर्शक म्हणून विलास नवले , तुकाराम गवारे , संपतभाऊ कोहकडे तर राजकीय सल्लागार नवनाथ नवले ह्यांची निवड करण्यात आली. ह्या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष नंदकुमार नवले आणि महिला अध्यक्ष आशा मासळकर ह्यांनी राज्याचे मा. राज्यमंत्री आणि प्रहार चे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चूभाऊ कडू , प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्रजी सातव , पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अनिताताई कदम , पुणे जिल्हा अध्यक्ष शरदराव जाधव ह्यांच्या नेतृत्वात काम करून दिव्यांगांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले .
ह्या प्रसंगी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे शिरूर तालुका कार्याध्यक्ष संभाजी नवले ह्यांनी केले.
ह्या प्रसंगी रंगनाथ फलके, माणिक दुंडे, रामदास गवारे , उमेश कोहकडे , अरूण नवले , राजेंद्र भोईटे, मायाताई फलके,मीरा कर्डिले , रुक्मिणी वाळके ,शंकर कोहकडे , दादाभाऊ जगताप , सुनीता देशमुख ,विजय फलके, दादाभाऊ वाघ , मयुर किठे, साहेबराव मासाळकर , अमोल फलके,गणेश पवार ,दादाभाऊ नवले ,ओंकार नवले , संदीप जगताप ,मोनाली नवले , अनिता नवले , पांडुरंग पवार हे सदस्य उपस्थित होते
