कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे)
कोरेगाव भिमा, (ता. शिरुर )येथील भिमानदी तीरावर असलेल्या गणपती विसर्जन घाटावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसत आहे.
ग्रामपंचायतने या परिसराची कोणत्याही प्रकारे स्वच्छता केलेली नाही. सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरेगाव येथील भिमानदीला भरपूर पाणी असल्याने कोरेगाव भिमा, सणसवाडी, वाडा पुनर्वसन तसेच वाड्या वस्त्यांवरील नागरिक गणपती विसर्जनासाठी येत आहेत.
गणेश भक्त दीड दिवस, पाचवा दिवस, सातवा दिवस, नववा दिवस व अकरावा दिवस या दिवसांत गणपती विसर्जन करत असतात .
तसेच येथे गौरी विसर्जनही केले जाते. परंतु विसर्जन घाटावरील अस्वच्छता रोगराईला निमंत्रण देत आहे. तसेच येथील शौचालयातही मोठी दुर्गंधी पसरली आहे. गणपतीचे निर्माल्य नदी पात्रात गेल्याने नदी पात्र खराब होते. मात्र या ठिकाणी निर्माल्य ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था ग्रामपंचायत सरपंच यांनी केलेली दिसत नाही.
ग्रामपंचायतने अनंत चतुर्थीला तरी विसर्जन घाटावर स्वच्छता करावी अशी नागरिक मागणी करीत आहेत.
