शिक्रापूर प्रतिनिधी:विनायक साबळे
मा. आमदार अशोकबापु पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ,सामाजिक बांधिलकी जपत व एक विधायक समाजोपयोगी उपक्रम राबवत माहेर संस्थेतील मनोरुग्ण ,वृद्ध,महिला व बालकांना अन्नदान करण्यात आले.
माजी आमदार अशोकबापु पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सणसवाडी येथील अशोकबापु पवार यांचे जिवाभावाचे निष्ठावान समर्थक माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडिताप्पा दरेकर व मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत एक विधायक समाजोपयोगी उपक्रम राबवत माहेर संस्थेतील मनोरुग्ण,वृध्द, महिला व बालकांना अन्नदान करत आमदार अशोकबापु पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी माहेर सस्थेतील मनोरुग्ण ,वृद्ध,महिला व बालकांना अन्नदान करण्यात आले.यावेळी माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडितआप्पा दरेकर व मित्र परिवाराने स्वतः जेवण वाढले ,तसेच माहेर मधील मनोरुग्ण ,वृद्ध,महिला व बालकांशी संवाद साधला.
यावेळी दिव्यांग बांधवांच्या हस्ते केक कापण्यात आला ,तसेच त्यांना गोडा असा खाऊ ही देण्यात आल्याने त्यां सर्वांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडितआप्पा दरेकर, शिरूर मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्ताभाऊ हरगुडे, सणसवाडीच्या सरपंच रूपाली दरेकर, उपसरपंच राजु आण्णा दरेकर , शिरूर काँग्रेस यांच्या अध्यक्ष वैभव तात्या यादव , माजी चेअरमन सुहास बापू दरेकर, कैलास दरेकर , ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर, सुनीता दरेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ दरेकर, उद्योजक सुभाष दरेकर , विठ्ठल दरेकर, निलेश दरेकर प्रशांत दरेकर, सुखदेव दरेकर ,प्रवीण वाखारे ,शाम दरेकर, प्रदीप म्हेत्रे ,संतोष शेळके, श्री निवास कांचन, बाळकृष्ण दरेकर, गणेश हरगुडे ,अशोक करडे ,पंढरीनाथ गोरडे अनिल गोटे सर आणि सणसवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
