शिरूर प्रतिनिधी
चेतन दादा साठे यांनी आपण ही समाज्याचे काही तरी देणे लागतो ही भावना ठेवत १८/०८/२०२५ रोजी, आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चा तून गरीब ,गरजू लोकांसाठी महाआरोग्य योजना शिबीराचे आयोजन केले होते.
या शिबिरात विविध मान्यवरांनी सहभाग घेतला तसेच अनेक गरीब कुटुंबातील लोकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला व अनेक योजनाचा लाभ घेतला . चेतन साठे यांनी नागरिकांना एकत्रित करत, महात्मा ज्योतिराव फुले ,जण आरोग्य योजना व आयुष्यमान भारत,प्रधानमंत्री जण आरोग्य योजना याचे 107 मोफत कार्ड काडून दिले .
तसेच यावेळी नागरीकांना योजना अंतर्गत उपचार व शस्त्रक्रिया बाबत ही माहिती देण्यात आली.
या कार्यकमाच्या वेळी बोलताना चेतन साठे म्हणाले की अनेक सरकारी योजना येतात व त्या फक्त कागदावर राहतात,त्यांचा फायदा कसा घेण्यास हवा,अथवा त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागते किव्हा कोणता फॉर्म भरावा लागतो,या पासून गोर गरीब जनता वंचित राहतात.अशा लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. कारण अगोधरच गरिबी आणि त्यात जर हॉस्पिटल चा खर्च वाढला तर या लोकांना मरणा पेक्षा ही जास्त त्रास होत असतो.सध्या महागाई बरोबर शिक्षणाचा खर्च व हॉस्पिटल चा खर्च गरिबांना भागवणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. आपण कायम गोरगरीब नागरिकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करीत राहणार आहोत अशी ग्याही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी कार्यक्रमाच्या वेळी मातंग एकता आंदोलन अध्यक्ष सतीश बागवे,काका पाटोळे,नगरसेवक विनोद भालेराव, बसपा चे अविनाश शिंदे,युवा नेते मयूर भोसले,रमेश भाऊ कांबळे,हर्ष गायकवाड, आकाश जगधने,सुमित बागवे,गणेश गोरखे,सिद्धू घाडगे, जयकृष्णन बंगारु,दादा झिंझुरके, ओम अडागळे,अमोल,सामाजिक कार्यकर्ते सुरेश गाडेकर, व भिम छावा संघटना पदाधिकरी व कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
