शिरूर प्रतिनिधी:
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजातील सर्व घडामोडी व हालचालींवर लक्ष ठेवून असतो आणि तो शासन व जनता यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो म्हणून आज होत असलेला हा महाराष्ट्राची भूमी चतुर्थ वर्धापन दिन व पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा ,संदेश केंजळे पोलीस निरीक्षक शिरूर यांनी दिल्या.
महाराष्ट्राची भूमी पत्रकार तळागाळात जाऊन समाजाच्या असणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो,असे डी वाय एस पी (एक्साईज) सागर शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.
शिरूर येथील निसर्ग मंगल कार्यालय ( निवासी मूकबधिर शाळा ) नाव्हरा फाटा येथे महाराष्ट्राची भूमी या नावाजलेल्या साप्ताहिकाचा चौथा वर्धापन दिन संपन्न झाला.
या वर्धापन दिनाच्या अध्यक्षस्थानी सागर शेलार डीवायएसपी हे होते तर संतराज महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव दादा महाराज साठे हे या कार्यक्रमाचे उद्घाटक होते. संदेश केंजळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले. रांजणगाव पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे , डी. डी. बारवकर , भाजपा युवक अध्यक्ष राहुल रणदिवे, शिरूर तालुका पाटिल संघाचे अध्यक्ष प्रकाश करपे पाटील ,नामदेव गिरमकर संचालक शिरूर खरेदी विक्री संघ ,रामदास बत्ते अध्यक्ष राष्ट्रीय किसान मजदूर संघ शिरूर, राजेंद्र जाधव मा. उपसरपंच व उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नागरगावं ग्रामपंचायत सरपंच जयश्री ताई रणदिवे, बाभुळ सर बुद्रुक सरपंच दिपाली महेंद्र ताई नागवडे, दिपिकाताई भालेराव, निर्मलाताई माने तालुका अध्यक्षा विजय रणस्तंभ सेवा संघ , रिनाताई सोनवणे सामाजिक कार्यकर्त्या शिक्रापूर, पूनम घोडके , पत्रकार शोभाताई परदेशी, सुरज करंकाळ ,मुख्य संपादक आनंदा बारवकर ,कार्यकारी संपादक विठ्ठल होले आणि महाराष्ट्रची भूमीचे सर्व पत्रकार याप्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्राची भूमी वर्धापन दिनानिमित्त भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी वर्धापन दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
