शिरूर प्रतिनिधी:
शिरूर मधील दहा खाजगी शाळा व संस्था यांनी केलेल्या नियमबाह्य कारभार व भ्रष्टाचाराच्या विरोधात जिल्हा प्रशासन पुणे यांच्याकडून केल्या गेलेल्या चौकशी अहवाला नुसार या सर्व दोषी शाळांची मान्यता रद्द करून त्यांना शासनाने ताब्यात घेऊन त्यांचे कामकाज शिक्षण विभागामार्फत प्रशासक नेमून करण्यात यावे.

नेमक्या कोणत्या शाळा आहेत :
शिरुर गटातील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर एम धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, विद्याधाम प्राथमिक शाळा, सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल, गुरुवर्य शंकरराव भुजबळ इंग्लिश मीडियम स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, छत्रपती संभाजी शिक्षण संस्था संचलित विजयमाला विद्यामंदिर शिरूर, पोखरणा एज्युकेशन ट्रस्ट संचलित विजन इंटरनॅशनल स्कूल, बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल व कृषीलोक विकास संशोधन संस्था संचलित जीवन विकास मंदिर या दहा शाळांच्या नियमबाह्य व मनमानी शाळा शिरूर मधे सुरू आहेत.
शैक्षणिक वर्ष 2018 19 पासून शाळांनी पालकांकडून बेकायदेशीर रित्या गोळा केलेले शुल्क परत करण्यात यावे. तसेच दोषी आणि नियमबाह्य कारभार करणाऱ्या शाळांना पाठीशी घालून वर्षानुवर्ष पालकांची लूट होत असताना, शिक्षण विभागाच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई करावी .
या मागण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचरणे यांच्यासह अनेक विद्यार्थी पालक हे मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषण आंदोलना साठी बसलेले आहेत.