शिरूरमध्ये ‘इंडिया मोबाईल’ शोरूमचे भव्य उद्घाटन; बिग बॉस फेम सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीने तरुणाईची तुफान गर्दी

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:सुदर्शन दरेकर
शिरूर शहरातील “निर्माण प्लाझा” येथे ‘इंडिया मोबाईल’ या अध्यायवत मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन नुकतेच मराठी बिग बॉस फेम आणि रील स्टार सूरज चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला शिरूरकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली असून, विशेषतः तरुणाईमध्ये या कार्यक्रमाची प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली.

उपस्थित मान्यवर:

यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे, शिरूर चे माजी नगराध्यक्ष रवी उर्फ शाम मनोहर ढोबळे, शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद कालेवार, प्रवीण दसगुडे, भाजपाचे नेते धर्मेंद्र खांडरे, शिरूर प्रवासी संघटनेचे अनिल बांडे,लोक नियुक्त सरपंच विठ्ठल घावटेइत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मोबाईल शो रूम चे आयोजक:

शोरूमचे आयोजक रुस्तम सय्यद व अकबर पठाण यांनी या अध्यायवत मोबाईल दालनाचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, “शिरूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार मोबाईल व अ‍ॅक्सेसरीज उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे.”

सूरज चव्हाण चा बोलण्याचा अंदाज:

उद्घाटन प्रसंगी बोलताना सूरज चव्हाण यांनी आपल्या खास अंदाजात “हे माझं क्षेत्र आहे, आणि इथूनच मी सुरूवात केली होती!” अशा लोकप्रिय डायलॉग्समधून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या चाहत्यांनी सेल्फी घेण्यासाठी आणि त्यांना पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी केली होती.


या उद्घाटन सोहळ्याला शिरूर शहरातील अनेक मान्यवर, व्यावसायिक, व्यापारी आणि युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘इंडिया मोबाईल’ शोरूममुळे शिरूरमध्ये मोबाईल खरेदीचा एक नवा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध झाला आहे, असे नागरिकांतून मत व्यक्त केले जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रुस्तम सय्यद, अकबर पठाण यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 7 8 4 1
Users Today : 23
Users Yesterday : 115