Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

ग्लॅमर फॅशन आयकॉन” या भव्य सौंदर्य स्पर्धेचे आयोजन…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
ग्लॅमर फॅशन आयकॉन” या भव्य सौंदर्य स्पर्धेमध्ये विविध वयोगटांतील स्पर्धकांनी उत्साहात सहभाग घेतला. किड्स, टीन, मिस, मिसेस आणि मिस्टर या सर्व कॅटेगरीजमधील विजेत्यांना ट्रॉफी, क्राऊन, सर्टिफिकेट, सॅश आणि आकर्षक गिफ्ट्स देण्यात आले.
स्पर्धकांसाठी खास फोटोशूट, स्टायलिश आऊटफिट्स, मेकअप, हेअरस्टाईल व प्रशिक्षणाची सोय करण्यात आली होती.

प्रत्येक सहभागी स्पर्धकाला मंचावर आपली कला दाखवण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयोजक, ट्रेनर्स, कोरिओग्राफर्स व संपूर्ण टीमने मोठे योगदान दिले.

सूत्र संचालन:

या भव्य कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, जे शंकर मुळे यांच्या हस्ते पार पडले. शोचे दिग्दर्शन ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजन तन्वी मुळे आणि काजल कोर्डे यांनी केले. रूपाली मुळे आणि मीनाक्षी पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ,नितीन बोधे सर आणि कारेश्वर इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राचार्या स्नेहलता यादव मॅडम उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाच्या वेळी गणेश वंदना ,रॉयल डान्स अकादमीने सादर केली.ज्यांचे प्रशिक्षण माधुरी जायभाये यांनी दिले होते.

कार्यक्रमात मुलं, किशोर, मिस, मिसेस, मिस्टर आणि रनवे मॉडेल अशा विविध गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. एकूण १७० स्पर्धकांनी सहभाग घेतला.

विजेते स्पर्धक:

विजेते (वय गटानुसार)
मुलांची श्रेणी (वय २ ते ५ वर्षे)
विजेती – राजनंदिनी धुमाळ,
उपविजेती – जान्हवी जाधव
• द्वितीय उपविजेती – केतकी वाबळे,
मुलांची श्रेणी (वय ६ ते १० वर्षे),मुलगे विजेता – दिव्यांश जाधव,प्रथम उपविजेता – विहान गुरव,
द्वितीय उपविजेता – प्रवीश गाडवे,मुली विजेती – सानिका सावळे,उपविजेती – हियादा शेख,द्वितीय उपविजेती – झैनाब शाह,किशोर श्रेणी.
विजेता – अविनाश साबळे,
उपविजेती – शुभ्रा पाटील,
द्वितीय उपविजेती – आर्या मुळे,मिस श्रेणी विजेती – जिया देवरे,उपविजेती – पूजा शिंत्रे,द्वितीय उपविजेती – सिमरन गमरे,मिसेस श्रेणी,
विजेती – वृषाली गिध,उपविजेती – अंकिता पाईकराव,द्वितीय उपविजेती – परी मालवीय,मिस्टर श्रेणी
,विजेता – शुभम शर्मा,उपविजेता – किरण राऊत,द्वितीय उपविजेता – विश्वजीत दत्ता इत्यादी विजयी विजेते ठरले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21