Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

माहेर संस्थेतील कु. जैमी शेख ची राष्ट्रीय सब जुनिअर पावर लिफ्टिंग ठाण्यात अजिंक्य पद व महाराष्ट्र राज्य संघात निवड.

Facebook
Twitter
WhatsApp

सरदवाडी प्रतिनिधी : दत्तात्रय कार्डिले

कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सब आणि सब-ज्युनिअर पावर लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे शहराची कु. जैमी शेख हिने 76 किलो वजनगटातून विजेतेपद मिळवत महाराष्ट्र राज्य संघाच्या निवडीसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

 

हे तिच्या परिश्रमाचे आणि जिद्दीचे प्रतीक आहे. तिच्या या थोर यशाबद्दल सर्व सर्वांच्या शुभेच्छा व अभिनंदनरूपी अपेक्षा ही वाढल्या आहेत.

 

कु. जैमी शेख ही सध्या ‘माहेर आधारगृह’ वढू बुद्रुक ता. शिरूर, जिल्हा पुणे,येथे वास्तव्याला असून, माहेर संस्थेच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन , माहेर संस्थेचे अध्यक्ष हिरा बेगम मुल्ला,आधारगृहाच्या अधीक्षिका मा. स्वाती पाटील आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी तिच्यावर घेतलेले मोलाचे मार्गदर्शन, योग्य प्रशिक्षण, आणि दिलेला मानसिक आधार हे देखील या यशाचे खरे शिल्पकार आहेत.

 

त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कु. जैमी शेखला आज राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली आहे. तिच्या या विजयामागे असलेल्या सगळ्या आधारस्तंभांचे व विशेषतः माहेर बालगृह व तेथील सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार तिने व्यक्त केले.

 

पुढील वाटचालीसाठी कु. जैमी शेखला खूप खूप शुभेच्छा लुसी कुरियन यांनी दिल्या.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21